यू-ट्यूबच्या माध्यमातून कोट्यवधी कमावते लिली सिंह

फोर्ब्सच्या यादीत २०१५ साली यू-ट्यूबकडून सर्वात जास्त पैसे मिळवणारी व्यक्ती म्हणून लिली सिंहचं नाव पुढे आलं आहे. लिली सिंहचं यू-ट्यूबवर एक चॅनेल आहे, हे चॅनेल तिने २०१० साली सुरू केलं होतं.

Updated: Mar 21, 2016, 06:30 PM IST
यू-ट्यूबच्या माध्यमातून कोट्यवधी कमावते लिली सिंह title=

मुंबई : फोर्ब्सच्या यादीत २०१५ साली यू-ट्यूबकडून सर्वात जास्त पैसे मिळवणारी व्यक्ती म्हणून लिली सिंहचं नाव पुढे आलं आहे. लिली सिंहचं यू-ट्यूबवर एक चॅनेल आहे, हे चॅनेल तिने २०१० साली सुरू केलं होतं.

लिली सिंह ही २७ वर्षांची आहे, ती टोरांटोत राहते, सोशल मीडियावर ती सुपरवुमेन नावाने ओळखले जाते. सोशल मीडियावर तिला १.२ कोटी लोक फॉलो करतात. मुंबईत नुकताच यू-ट्यूबचा फॅनफेस्ट पार पडला, तेव्हा लिली सिंहने झी २४ तासशी चर्चा केली.

एका वर्षात तिने १५ कोटीपेक्षा जास्त रूपयांची कमाई यू-ट्यूबच्या माध्यमातून केली आहे. तिने २७ शहरांची वर्ल्ड टूर केली आहे, तर लहान चित्रपटांसारखे दुसरे काही प्रोजेक्टसही तिने केले आहेत. 

लिली सिंह नेमकं तिच्या यू-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून लोकांना कोणत्या प्रकारचे कार्यक्रम देते.लिलीने यासाठी फार मोठी मेहनत घेतली आहे. यावर लिली सिंह म्हणते अनेक वेळा मी खूप थकलेली असते, मला तिथे कॅमेऱ्याचा सामना करायचा नसतो, पण तिथे कॅमेरा असतो.