मोबाईलपेक्षा स्वस्त मायक्रोमॅक्सचा लॅपटॉप

स्मार्टफोनची चलती असताना आता लॅपटॉप या स्पर्धेत उतरलाय. मोबाईलपेत्रा स्वस्त असणारा लॅपटॉप बाजारात दाखल झालाय. मायक्रोमॅक्सने हा लॅपटॉप लॉन्च केलाय. 

Reuters | Updated: Oct 9, 2015, 06:53 PM IST
मोबाईलपेक्षा स्वस्त मायक्रोमॅक्सचा लॅपटॉप title=

नवी दिल्ली : स्मार्टफोनची चलती असताना आता लॅपटॉप या स्पर्धेत उतरलाय. मोबाईलपेत्रा स्वस्त असणारा लॅपटॉप बाजारात दाखल झालाय. मायक्रोमॅक्सने हा लॅपटॉप लॉन्च केलाय. 

मायक्रोमॅक्स कंपनी आता लॅपटॉपच्या बाजारपेठेत आपला दबदबा निर्माण करण्यास सज्ज झाल्याचे दिसून येत आहे. मायक्रोमॅक्सनं नवाकोरा 'कॅनव्हास लॅपबुक' लॉन्च केलाय. सेकंड जनरेशन 'लॅपटॅब'ही सादर केला आहे. 

मायक्रोमॅक्स 'कॅनव्हास लॅपबुक'ची किंमत केवळ १३,९९९ रुपये आहे. स्मार्टफोनच्या किंमतीत आता लॅपटॉप उपलब्ध झालाय. आजपासून 'स्नॅपडील'वर त्याची विक्री सुरू झाली आहे. 

काय आहे फिचर्स :
मायक्रोमॅक्स कॅनव्हास लॅपबुकमध्ये १.८३ गीगाहर्ट्झ क्वाड कोअर इंटेल एटम प्रोसेसर आहे. विंडोज - १० ऑपरेटिंग सिस्टिमवर हे लॅपबुक चालेल. त्यात ड्युएल स्पीकरही आहेत. 

११.६ इंची एचडी आयपीएस डिस्प्ले असलेल्या लॅपबुकची इनबिल्ट मेमरी ३२ जीबीची असून ती ६४ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. सर्वसाधारण वापर झाल्यास लॅपबुकची बॅटरी ११ तास चालेल. त्याचं वजन १.३ किलो आहे.

मायक्रोमॅक्सच्या सेकंड जनरेशन लॅपटॅबची किंमत १७ हजार ९९९ रुपये असून मंगळवारपासून तो अॅमेझॉनवर उपलब्ध होईल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.