मायक्रोसॉफ्ट 'लुमिया ५४०' बजेट स्मार्टफोन लॉन्च

विंडोज स्मार्टफोनच्या जगात मायक्रोसॉफ्टने आणखी एक बजेट थ्रीजी स्मार्टफोन लॉन्च केलाय. 'ल्युमिया ५३०'ला मिळालेल्या यशानंतर कंपनीने 'ल्युमिया ५४०' बाजारात आणला आहे. मे महिन्यात हा फोन भारत, मध्य पूर्व आफ्रिका आणि आशिया महाखंडात विक्रिसाठी उपलब्ध होईल. 

Updated: Apr 15, 2015, 08:02 PM IST
मायक्रोसॉफ्ट 'लुमिया ५४०' बजेट स्मार्टफोन लॉन्च title=

मुंबई : विंडोज स्मार्टफोनच्या जगात मायक्रोसॉफ्टने आणखी एक बजेट थ्रीजी स्मार्टफोन लॉन्च केलाय. 'ल्युमिया ५३०'ला मिळालेल्या यशानंतर कंपनीने 'ल्युमिया ५४०' बाजारात आणला आहे. मे महिन्यात हा फोन भारत, मध्य पूर्व आफ्रिका आणि आशिया महाखंडात विक्रिसाठी उपलब्ध होईल. 

विंडोज ८.१ ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारीत या फोनमध्ये ५ इंच हायडेफिनेशन डिस्प्ले उपलब्ध आहे. विंडोज १० लॉन्च झाल्यानंतर हा फोन अपडेट केला जाणार आहे. 

फोनमध्ये ड्युएल सिमसोबतच ड्युएल प्रोफाईलचीही सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे युजर प्रत्येक सिमबरोबरच आपलं वेगळं प्रोफाईल बनवू शकतील. तसेच कॉल फॉरवर्डदेखील करता येणार आहे. 

'ल्युमिया ५४०' मध्ये ८ जीबी इंटरनल मेमरी असेल... मायक्रो एसडी कार्डद्वारे ही मेमरी वाढवण्याचा ऑप्शन यामध्ये उपलब्ध असेल. 'ल्युमिया ५४०'ची किंमत जवळपास ९००० रुपये असणार आहे.

'माइक्रोसॉफ्ट ल्युमिया ५४०'ची वैशिष्ट्ये...
ऑपरेटिंग सिस्टम - विंडोज ८.१ 
चिपसेट- कॉलकॉम स्नैपड्रैगन २००
सीपीयू- १.२ गिगाहर्टझ Cortex-A7
रॅम- १ जीबी
कॅमेरा- ८ मेगापिक्सल रेअर, ऑटोफोकस, ५ MP का फ्रंट कॅमेरा
बॅटरी- २२०० मेगाहर्टझ

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.