मुंबई : मला माझा सेल्फी घ्यायचाय. असे शब्द सध्या वारंवार ऐकायला येतात. स्वतःला स्वतःच किंवा इतरांबरोबर क्लिक करण्याची ही कला मोबाईल फोनने शिकवली. सेल्फी घेण्याचे सध्या फॅडच झाले आहे. रोज लाखो सेल्फी घेतले जात असतील. या कलेला आता शैक्षणिक दर्जा प्राप्त झाला आहे. चक्क सेल्फी कोर्स सुरू होणार आहे.
इंग्लंडमधील सिटी लिट महाविद्यालय जगात प्रथमच सेल्फी कोर्स सुरू करणार आहे. 'द आर्ट ऑफ फोटोग्राफिक सेल्फ-पोर्ट्रेचर' असे या मासिक कोर्सला नाव देण्यात आले असून तो येत्या मार्चपासून सुरू होत आहे. 132 युरो म्हणजेच 9800 रूपये कोर्स फी आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.