दहावीचा ऑनलाइन निकाल ८ जून रोजी - मंडळ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेच्या निकाल ८ जून रोजी दुपारी १ वाजेपासून ऑनलाइन पाहता येणार आहे. 

Updated: Jun 7, 2015, 04:15 PM IST
दहावीचा ऑनलाइन निकाल ८ जून रोजी - मंडळ  title=

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत (दहावी) परीक्षेच्या निकाल ८ जून रोजी दुपारी १ वाजेपासून ऑनलाइन पाहता येणार आहे. 

दहावीचा निकाल लागण्यास उशीर झाला होता. त्या संदर्भात अनेक अफवा पसरत होत्या या संदर्भात काल मंडळाने पत्रकार परिषद घेऊन आज निकालाची तारीख जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. त्या संदर्भात आज पुणे येथे या संदर्भात बैठक सुरू होती. त्या बैठकीत दहावीचा निकाल ८ जून रोजी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेचे वाटप १५ जून रोजी माध्यमिक शाळांमध्ये दुपारी ३ वाजता करण्यात येणार आहे.  गुण पडताळणी (रिचेकिंग) २६ जूनपर्यंत विभागीय मंडळाकडे अर्ज करण्यात यावा. 

राज्यातील नऊ मंडळाचा यात समावेश आहे. यात पुणे, मुंबई, कोकण, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, लातूर, नागपूर आदी मंडळांचा समावेश आहे.

निकाल पाहण्यासाठी

> www.mahresult.nic.in

> www.mahahsscboard.maharashtra.gov.in

>www.rediff.com/exams

> www.knowyourresult.com/MAHSSC

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.