'कार्याह' फॅशन पोर्टलमध्ये रतन टाटांची गुंतवणूक

टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी स्वत: कार्याह या फॅशन क्षेत्रातील संकेतस्थळामध्ये गुंतवणूक केली आहे. टाटा यांनी फॅशन क्षेत्रासाठी वाहिलेल्या संकेतस्थळातील हिस्सा खरेदी केला आहे. मात्र याबाबतचे प्रमाण व हिस्सा स्पष्ट करण्यात आलेला नाही. 

Updated: Jun 4, 2015, 08:04 PM IST
'कार्याह' फॅशन पोर्टलमध्ये रतन टाटांची गुंतवणूक title=

मुंबई : टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी स्वत: कार्याह या फॅशन क्षेत्रातील संकेतस्थळामध्ये गुंतवणूक केली आहे. टाटा यांनी फॅशन क्षेत्रासाठी वाहिलेल्या संकेतस्थळातील हिस्सा खरेदी केला आहे. मात्र याबाबतचे प्रमाण व हिस्सा स्पष्ट करण्यात आलेला नाही. 

'कार्याह'च्या संस्थापिका निधी अगरवाल यांनी वृत्तसंस्थेला टाटा यांच्या गुंतवणुकीबाबत दुजोरा दिला आहे. यावरून वेगाने वाढणाऱ्या ई-कॉमर्स क्षेत्रातील टाटा समूहाचा रस वाढतच चालला आहे. 

कार्याह.कॉमद्वारे तयार वस्त्र प्रावरणातील विविध अठराहून अधिक प्रकारचे कपडे उपलब्ध करून दिले जातात. कंपनी असलेल्या क्षेत्राची बाजारपेठे येत्या तीन ते चार वर्षांमध्ये १५,००० कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

१०० अब्ज डॉलरच्या टाटा समूहातून रतन टाटा डिसेंबर २०१२ मध्ये निवृत्त झाले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ते ई-कॉमर्सकडे आकर्षिले गेले. स्नॅपडिल, अर्बन लॅडर, ब्ल्यूस्टोन, कारदेखो.कॉम आदी इ व्यासपीठांमध्ये त्यांनी गुंतवणूक केली आहे. याशिवाय पेटीएम, अल्टारोस एनर्जीज, शिओमी अशा अन्य माध्यमांमधील कंपन्यांमध्येही गुंतवणूक आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.