नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान यांनी आता ट्विटरवर तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्यामुळे जगामध्ये मोदी हे तीन क्रमांकाचे नेते झाले आहेत. गेल्या आठवड्यात चौथ्या स्थानावर असलेले मोदींनी लगेच तिसरे स्थान पटकावलेय.
पहिल्या स्थानी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा त्यानंतर पोप दुसऱ्या स्थानी तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्या स्थानावर आहेत.
गेल्या आठवड्यात चौथ्या स्थानावर असलेल्या मोदींनी इंडोनेशियाईच्या राष्ट्रपती एस.बी. युध्दोयोनो यांना मागे टाकले आहे. लोकप्रिय मायक्रोब्लॉगिंग वेबसाईटवर मोदी 50.9 लाख फॉलोअर आहेत. ट्विटरवर बराक ओबामांचे 4.39 कोटी फॉलोअर,पोप यांचे 1.4 कोटी आणि युद्धोयोनोचे 50.8 लाख फॉलोअर आहे.
वेबसाईटने यावर प्रतिक्रिया दिलेय की, मोदींचा सर्वसामान्य जनतेशी नाते चांगले आहे. ते किती कार्यक्षम आहेत, हे यावरुन स्पष्ट होते.
फेसबुकचे सीईओ शेरील सॅडबर्ग यांनी बुधवारी सांगितले की, मोदी सोशल नेटवर्कींग साईटवर दुसरे सर्वात लोकप्रिय व्यक्ती आहेत. त्यांना 1.89 कोटी लोक पसंत करतात. ओबामा पहिल्या स्थानावर आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.