रिझर्व बँकेत ५०६ पदांची भरती

 नोकरीची वाट पाहणाऱ्या हजारो बेरोजगार तरूणांसाठी एक खुशखबर... भारतीय रिझर्व बँकेने ५०६ पदांसाठी जाहिरात काढून योग्य भारतीय उमेदवारांचे अर्ज मागविले आहेत. 

Updated: Jul 21, 2014, 09:23 PM IST
रिझर्व बँकेत ५०६ पदांची भरती title=

मुंबई :  नोकरीची वाट पाहणाऱ्या हजारो बेरोजगार तरूणांसाठी एक खुशखबर... भारतीय रिझर्व बँकेने ५०६ पदांसाठी जाहिरात काढून योग्य भारतीय उमेदवारांचे अर्ज मागविले आहेत. 

अर्जासंदर्भातील माहिती पुढील प्रमाणे 

एकूण पद- 506

पदं – असिस्टेंट

वयोमर्यादा – अर्जदाराचे वय 18 ते 28 वर्षांच्या आत असायला हवे
वयाची गणना १ जुलै २०१४पासून केली जाईल 
आरक्षित वर्गाला नियमानुसार आयुसीमाची सूट दिली जाईल.

शैक्षणिक पात्रता – अर्जदाराने मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेली असावी.

सामान्य आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांना पदवी परीक्षेत ५० टक्के गुण अनिवार्य आहेत. तर एससी/एसटी पदवीधारक केवळ उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. 

निवड प्रक्रिया - अंतिम निवड लिखित परीक्षा आणि इंटरव्यूमध्ये चांगले प्रदर्शन केलेल्या उमेदवाराची निवड केली जाईल.

अर्ज शुल्क - सामान्य आणि ओबीसी अर्जदारासाठी 450 रूपये, इतरांसाठी 50 रूपये अर्ज शुल्क द्यावे लागेल.

अर्ज शुल्क ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही मोडमध्ये भरू शकतो. ऑफलाइन शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख -11 ऑगस्ट, 2014 आहे.

अर्ज प्रक्रिया- इच्छुक उमेदवार आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन लॉग-इन करून अर्ज करू शकतात.

वेबसाइटचा पत्ता - www.rbi.org.in 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.