तुमच्या बोटांचे ठसे सांगतील तुमच्याविषयी सर्व काही

मुंबई : तुमची पार्श्वभूमी जाणण्यासाठी साधारणतः तुमचा चेहरा, तुमचे कपडे यावरुन अंदाज लावला जातो.

Updated: Mar 23, 2016, 02:08 PM IST
तुमच्या बोटांचे ठसे सांगतील तुमच्याविषयी सर्व काही title=

मुंबई : तुमची पार्श्वभूमी जाणण्यासाठी साधारणतः तुमचा चेहरा, तुमचे कपडे यावरुन अंदाज लावला जातो. पण, तुमच्या बोटांचे ठसेही तुमच्यासाठी बरंच काही सांगतात, असं तुम्हाला सांगितलं तर खरं वाटणार नाही ना? पण, तुमच्या हाताच्या बोटांचे ठसे तुमच्याविषयी बरंच काही सांगतात असा दावा केलाय एका अमेरिकन मासिकानं.

मासिकानं केलेल्या दाव्यानुसार एखाद्या व्यक्तीची पार्श्वभूमी जाणण्यासाठी केवळ व्यक्तीच्या बोटाचे ठसे पुरेसे असतात. यासाठी संशोधकांनी २४३ वंशाच्या व्यक्तींच्या एका हाताच्या तर्जनीच्या बोटांचे आणि दुसऱ्या हाताचे विस्तृत अध्ययन केलंय. आपल्या व्यक्तीमत्वाचा आपल्या बोटांवर कसा ठसा उमटतो याचा अभ्यासही त्यांनी केला.

बोटांच्या ठशावरुन तो मुलांचा आहे की मुलींचा? हे स्पष्ट होत नसले तरी या ठशांमुळे ती व्यक्ती कोणत्या वंशाची आहे, याचा मात्र शोध घेतला जाऊ शकतो, असं संशोधकांचं म्हणणे आहे. त्यामुळे केवळ बोटांच्या ठशांवरुन एखादी व्यक्ती आशियाई, युरोपियन, आफ्रिकी की अजून कोणत्या वंशाची आहे हे स्पष्ट होऊ शकते.

नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातील एन्थ्रोपोलॉजी विभागाद्वारे हे संशोधन करण्यात आले आहे. त्यांचे हे संशोधन 'अमेरिकन जर्नल ऑफ फिजीकल एन्थ्रोपोलॉजी' या नियतकालीकात प्रसिद्ध झाले आहे.