बाप्पासाठी खास ट्विटरचे नवे इमोजी

गणेशोत्सवानिमित्त मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरनं खास इमोजी आणलेत. ज्यावेळी ट्विट करताना गणेशोत्सवासंबंधी कुठलाही हॅशटॅग वापरल्यानंतर त्याच्यासमोर आपोआप हे इमोजी दिसणार आहेत. 

Updated: Sep 5, 2016, 08:03 AM IST
 बाप्पासाठी खास ट्विटरचे नवे इमोजी

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरनं खास इमोजी आणलेत. ज्यावेळी ट्विट करताना गणेशोत्सवासंबंधी कुठलाही हॅशटॅग वापरल्यानंतर त्याच्यासमोर आपोआप हे इमोजी दिसणार आहेत. 

जगभरातले कोट्यवधी नागरिक ट्विटरचा वापर करतात. ट्विटरवरच्या शब्दमर्यादेचा विचार करता, शब्दांची जागा कमी होऊ नये, याची काळजीदेखील ट्विटरनं घेतलीय. त्यामुळं इमोजीसाठी वेगळी स्पेस द्यावी लागणार नाही. 

गणेशोत्सवासंबंधीच्या हॅशटॅगला आपोआप ओळखून त्याच्यासमोर गणेशोत्सवाची ही खास इमोजी आपोआपच ऍपिअर होणार आहे.