मुंबई : नोकियानं आपल्या 'ल्युमिया'ची किंमत कमी होणार असल्याचं जाहीर केलंय. अमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर हा फोन विकत घेता येऊ शकेल.
'नोकिया'नं ल्युमिया ६२५ लॉन्च केला तेव्हा या फोनची किंमत होती १९,९९९ रुपये... त्यानंतर काही महिन्यांनी या फोनची किंमत कमी करून हा फोन १४,९१९ रुपये निर्धारीत करण्यात आली.
येत्या, प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं नोकियानं त्यांच्या ग्राहकांना खुशखबर देण्याचं ठरवलंय. येत्या २६ जानेवारी रोजी हा फोन ग्राहकांना केवळ ६,९९९ रुपयांना उपलब्ध होणार आहे.
या फोनचा डिस्प्ले ४.७ इंच आहे. याशिवाय, यामध्ये १ गीगाहर्टझ ड्युएल कोर स्नॅपड्रॅगन प्रोसेसर ५१२ एमबी रॅम आणि ८ जीबी इंटरनल मेमरी, ५ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंट कॅमेराही उपलब्ध आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.