फेसबूक रोखणार आता आत्महत्या

सोशल नेटवर्किंग साइ़ट फेसबूक आता मनोरंजन आणि चॅटिंग व्यतिरिक्त आत्महत्या रोखण्याचेही काम करणार आहे. पुढच्या काही दिवसात आत्महत्या करण्याच्या दृष्टिने विचार करणाऱ्या संशयीत युजर्सची मदत करण्याच्या दृष्टीने फेसबूककडून एक टूल सुरू करणार आहे.

Updated: Mar 28, 2015, 05:16 PM IST
फेसबूक रोखणार आता आत्महत्या  title=

मुंबई : सोशल नेटवर्किंग साइ़ट फेसबूक आता मनोरंजन आणि चॅटिंग व्यतिरिक्त आत्महत्या रोखण्याचेही काम करणार आहे. पुढच्या काही दिवसात आत्महत्या करण्याच्या दृष्टिने विचार करणाऱ्या संशयीत युजर्सची मदत करण्याच्या दृष्टीने फेसबूक एक टूल सुरू करणार आहे.

अमेरिकेमध्ये यापूर्वीच हे टूल सुरू करण्यात आले आहे. फेसबूक युजर्सकडून त्याला पसंतीही मिळाली आहे. त्याबद्दल अमेरिकेच्या मानसशास्त्रज्ञांनी फेसबूकची प्रशंसा केली आहे. आता हे टूल ऑस्ट्रेलियात सुरू करण्यात येणार आहे. 

फेसबूकच्या माहितीनुसार हे टूल आपल्या युजर्सच्या चिंताजनक पोस्टचा अहवाल तयार करणार आहे.  त्यानंतर चिंताजनक पोस्टचा अभ्यास करून तशी पोस्ट टाकणाऱ्या युजरला योग्य ते सल्ले देऊन आत्महत्या करण्यापासुन रोखण्यात येणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.