नवी दिल्ली : कॅब सर्व्हिस देण्याऱ्या ओला कॅब या सर्व्हिस कंपनीने आपल्या ग्राहकाला अतिशय छान उत्तर दिलं आहे.
ओला कॅबचा एक ग्राहक सिलम वीरप्पा नायडूने ओलाकॅब्सला आपल्या ट्विटर हँडलने @SVeerapaNaidu द्वारा ट्विट करून, आपल्याला देण्यात येणाऱ्या टॅक्सीचा ड्रायव्हर हिंदू असावा, अशी मागणी केली होती. म्हणजेच या ग्राहकाला कोणत्याही दुसऱ्या धर्माचा ड्रायव्हर हा टॅक्सी चालक म्हणून नको होता.
ओलाकॅब्सने या ग्राहकाला सुंदर शब्दात उत्तर दिलं आहे, "माफ करा, आम्ही धर्माच्या आधारावर ड्रायव्हर देत नाहीत, तसा कोणताही भेदभाव करत नाहीत", यानंतर ट्वीटरवर प्रतिक्रियांचा पाऊस पडत होता.
यात जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा देखिल समावेश आहे, ते म्हणतात, ओलाकॅब्स तुम्हाला योग्य गोष्टी करण्यात यश मिळो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.