अबब...ऑनलाईन फ्लिपकार्टने फंडिंगद्वारे जमा केलेत 6 हजार कोटी

ऑनलाईन रिटेलर फ्लिपकार्ट कंपनीनं फंडिंगद्वारे 100 कोटी डॉलर्स म्हणजेच तब्बल 6 हजार कोटी रुपये जमा केलेत.

Updated: Jul 30, 2014, 03:45 PM IST
अबब...ऑनलाईन फ्लिपकार्टने फंडिंगद्वारे जमा केलेत 6 हजार कोटी  title=

मुंबई : ऑनलाईन रिटेलर फ्लिपकार्ट कंपनीनं फंडिंगद्वारे 100 कोटी डॉलर्स म्हणजेच तब्बल 6 हजार कोटी रुपये जमा केलेत.

इतकी मोठी रक्कम जमा करत फिल्पकार्टनं एका अर्थाने इतिहासच रचला आहे. कारण पहिल्यांदाच एखाद्या इंटरनेट कंपनीने इतकी मोठी रक्कम जमा केलीय. 

कंपनीने टी रोवे प्राईज, जी आय सी सारख्या नव्या गुंतवणूकदारांनी कंपनीत गुंतवणूक केलीय. त्याचबरोबर टायगर ग्लोबल आणि एसेल पार्टनर्सनेही कंपनीत फंडिंग केलीय. सूत्रांच्या माहितीनुसार या नव्या गुंतवणुकीमुळे 
फ्लिपकार्टचं व्हॅल्यूएशन 30 ते 35 हजार कोटी रुपए झाले आहेत.

मे महिन्यतील फंडिंगच्या वेळी कंपनीचं व्हॅल्यूएशन तब्बल 18 हजार कोटी होतं. फ्लिपकार्टनं सध्या तरी आपण आय पी ओ आणणार नसल्याचं म्हंटलय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.