`राष्ट्रपती भवना`त काम करण्याची संधी मिळाली तर...

तुम्ही पदवीधर असाल आणि शिकण्याची तयारी असेल तर आता तुम्हाला थेट राष्ट्रपती भवनात इंटर्नशिप करण्याची संधी मिळू शकते. राष्ट्रपती भवनाच्या ` प्रेस विंग ` ने इंटर्न शोधासाठी मोहीम हाती घेतली असून राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भातला अध्यादेशही जारी झाला आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 11, 2012, 10:30 AM IST

www.24taaas.com, नवी दिल्ली
तुम्ही पदवीधर असाल आणि शिकण्याची तयारी असेल तर आता तुम्हाला थेट राष्ट्रपती भवनात इंटर्नशिप करण्याची संधी मिळू शकते. राष्ट्रपती भवनाच्या ` प्रेस विंग ` ने इंटर्न शोधासाठी मोहीम हाती घेतली असून राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भातला अध्यादेशही जारी झाला आहे.
http://presidentofindia.nic.in/ या वेबसाईटवर याबद्दल अधिक माहिती तुम्हाला मिळू शकते. राष्ट्रपती भवनातील प्रेस विंगमधे ही संधी उपलब्ध करून देण्यात आलीय. पत्रकारितेतील पदवीधर तसेच कायदा , इतिहास , राज्य शास्त्र विषयातून पदवी घेतलेले विद्यार्थी या इंटर्नशिपसाठी पात्र ठरणार आहेत. इंटर्नशिपचा कालावधी एकूण तीन महीन्यांचा असून उमेदवाराचे काम पाहून तो एक वर्षापर्यंत वाढवलाही जाणार आहे. तसेच या कालावधीमधे निवड झालेल्या उमेदवारांना ५००० रुपयांचे शुल्क वेतन म्हणून मिळणार आहे.
इंटर्नशिपचा कालावधी संपल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे तसंच इंटर्नशिपचा कालावधी संपल्यानंतर ठराविक उमेदवारांना कायम केलं जाणार आहे. २६ डिसेंबरपर्यंत तुम्ही यासाठी अर्ज पाठवू शकता.