पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल आता अँड्रॉईड ऍपवर

पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल आता अँड्रॉईड ऍपवर उपलब्ध होणार आहे. एमएसबीटीईनं ही सुविधा उपलब्ध करुन दिलीय. 

Updated: Jan 21, 2017, 01:48 PM IST
पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल आता अँड्रॉईड ऍपवर  title=

मुंबई : पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा निकाल आता अँड्रॉईड ऍपवर उपलब्ध होणार आहे. एमएसबीटीईनं ही सुविधा उपलब्ध करुन दिलीय. 

सध्या या ऍपमधून पॉलिटेक्निक डिप्लोमाचा निकाल पाहता येणार आहे. पुढच्या काळात या ऍपवर एमएचसीईटी परीक्षेचा निकाल पाहणंही शक्य होईल. त्यासाठी महाबीटीई नावाचं ऍप डाऊनलोड करावं लागणार आहे. 

पॉलिटेक्निकच्या डिप्लोमा परीक्षेला हजारो विद्यार्थी बसतात. या परीक्षेचा निकाल लागल्यावर एकाचवेळी हजारो विद्यार्थी वेबसाईट ओपन करतात. त्यामुळे सर्वरवर लोड येऊन वेबसाईटचा वेग कमी होतो. यावर मार्ग काढण्यासाठी आता ऍपवर हा निकाल पाहणं शक्य होणार आहे.