राधिका आपटेचं 'कास्टिंग काऊच' इंटरनेटवर व्हायरल

मुंबई : 'कास्टिंग काऊच'च्या प्रथेबद्दल आजही भारतात फारसं बोललं जात नाही. 

Updated: Apr 6, 2016, 06:26 PM IST
राधिका आपटेचं 'कास्टिंग काऊच' इंटरनेटवर व्हायरल  title=

मुंबई : 'कास्टिंग काऊच'च्या प्रथेबद्दल आजही भारतात फारसं बोललं जात नाही. ज्यांना सिनेविश्वात मोठं होण्याची इच्छा असते, त्यातल्या अनेकांना या अनुभवातून जावं लागतं. अनेक मोठ्या अभिनेत्रींना त्यांच्या ऑडिशनच्या वेळी काही वाईट अनुभव येतात. त्यांच्याकडून बऱ्याचदा लैंगिक सुखाची मागणी केली जाते. काही कलाकारांनी याविषयी उघडपणे वाच्यता केली आहे.

पण, राधिका आपटेलाही या अनुभवातून जावं लागल्याचं तुम्ही ऐकलं का? 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम अमेय आणि त्याचा मित्र निपुण या दोघांनी मिळून ही एक सीरिज सुरू केलीये. त्याचा पहिला एपिसोड नुकताच यू ट्यूबवर रिलीज करण्यात आलाय. मराठीतली ही अशाप्रकारची पहिलीत सिरीज आहे. सध्या तरुणाईमध्ये त्याची जोरदार चर्चा आहे.