आता, 'जिओ'चा सेट टॉप बॉक्स देणार फ्री टीव्हीची सुविधा?

'जिओ'नं फ्री इंटरनेट देऊन बाजारात एकच धुमाकूळ उडवून दिल्यानंतर आता, येत्या काही दिवसांत रिलायन्स जिओ DTH (डायरेक्ट टू होम) सर्व्हिस क्षेत्रातही दमदारपणे उतरणार असल्याचं दिसतंय. 

Updated: Apr 5, 2017, 01:04 PM IST
आता, 'जिओ'चा सेट टॉप बॉक्स देणार फ्री टीव्हीची सुविधा? title=

मुंबई : 'जिओ'नं फ्री इंटरनेट देऊन बाजारात एकच धुमाकूळ उडवून दिल्यानंतर आता, येत्या काही दिवसांत रिलायन्स जिओ DTH (डायरेक्ट टू होम) सर्व्हिस क्षेत्रातही दमदारपणे उतरणार असल्याचं दिसतंय. 

रिलायन्स जिओच्या सेट टॉप बॉक्सचे काही लिक झालेले फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेत. इतकच नाही तर जिओचे प्लान, वेलकम ऑफरचीही सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. अर्थातच, रिलायन्समुळे टीव्हीदेखील फ्रीमध्ये पाहायला मिळू शकते, अशा जोरदार चर्चा झडतेय.

अशी असू शकते जिओची वेलकम ऑफर

रिलायन्स जिओच्या डीटीएच सर्व्हिसच्या वेलकम ऑफरमध्ये ९० दिवसांपर्यंत फ्री सर्व्हिस मिळू शकते. याचा उपयोग कंपनीला प्रमोशनसाठी होऊ शकतो. ग्राहकांची पसंती मिळाल्यानंतर त्यांच्याकडून पैसे वसूल केले जाऊ शकतात.

'वेलकम ऑफर'नंतर काय?

रिलायन्स आपल्या डीटीएच सर्व्हिससाठी १८०-२०० रुपये प्रती महिना चार्ज करू शकतं. आत्तापर्यंत इतर डीटीएच सर्व्हिस कंपन्या प्रती महिना २००-२५० रुपये चार्ज करतात. 

मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये ३०० चॅनल ग्राहकांना पाहायला मिळू शकतात... ज्यामध्ये हाय डेफिनेशन चॅनल्सचाही समावेश असेल. शिवाय इंग्रजी टीव्ही सीरिज फ्लॅश, गेम ऑफ थ्रोन्स इत्यादी भारतात दाखवण्यासाठी यूएस ब्रॉडकास्टर्ससोबत चर्चाही सुरू असल्याचं समजतंय.