नवी दिल्ली : टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने आदेश दिल्यानंतर रिलायन्स जिओला आपली समर सरप्राइज प्लान मागे घ्यावा लागला.
ट्रायच्या माहितीनुसार, जिओचा हा नवा प्लान ट्रायच्या 'रेग्युलेटरी फ्रेमवर्क'नुसार नव्हता. त्यामुळे हा प्लान मागे घेण्याचे आदेश दिले.
ट्रायचे सचिव सुधीर गुप्ता म्हणाले, एक एप्रिलला आम्ही जिओच्या काही मुद्द्यांवर स्पष्टीकरण मागितले होते. त्यानंतर ५ एप्रिलला बैठक बोलावण्यात आली. यावेळी जिओच्या ३०३ रुपयांच्या रिचार्ज ऑफरवर चर्चा करण्यात आली. मात्र ठोस उत्तर काही हाती लागले नाही. त्यामुळेच ही ऑफर मागे घेण्याचे आदेश देण्यात आले.
३१ मार्चला फ्री सेवा संपल्यानंतर जिओनं समर सरप्राईज ऑफर लॉन्च केली. या ऑफरनुसार ग्राहकांना ९९ रुपयांची प्राईम मेंबरशीप घ्यावी लागणार होती तसंच १५ एप्रिलपर्यंत ३०३ रुपयांचं रिफील करणं बंधनकारक होतं.