मुकेश अंबानींच्या रिलायन्स जीओनं वाढवला अनिल अंबानींचा त्रास

मुकेश अंबानी यांनी मोठ्या दिमाखात रिलायन्स जीओच्या नावानं 4G इंटरनेट सेवा सुरु केली.

Updated: Sep 3, 2016, 11:14 PM IST
मुकेश अंबानींच्या रिलायन्स जीओनं वाढवला अनिल अंबानींचा त्रास title=

मुंबई : मुकेश अंबानी यांनी मोठ्या दिमाखात रिलायन्स जीओच्या नावानं 4G इंटरनेट सेवा सुरु केली. रिलायन्स जीओचं सीमकार्ड घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ग्राहक उत्सुक आहेत. पण मुकेश अंबानींच्या या रिलायन्स जीओचा त्रास अनिल अंबानींच्या रिलायन्स मोबाईल स्टोअर्सना होताना दिसत आहे. 

रिलायन्स जीओचं सीमकार्ड घेण्यासाठी अनेक ग्राहक हे रिलायन्स मोबाईल स्टोअर्समध्ये जात आहेत. पण रिलायन्स मोबाईल स्टोअर्स हे अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशनच्या मालकीचे आहेत आणि रिलायन्स जीओ आणि रिलायन्स कम्युनिकेशनचा काहीही संबंध नाही हे सांगताना दुकानातल्या कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ येत आहेत. 

वारंवार चौकशीसाठी येणाऱ्या ग्राहकांना वैतागून अखेर रिलायन्स कम्युनिकेशनच्या दुकानांमध्ये आता जिओबद्दल चौकशी करु नये, इकडे जीओचे सीमकार्ड मिळत नाहीत असे पोस्टर लावण्यात आले आहेत. 

पाहा रिलायन्स कम्युनिकेशननं लावलेले पोस्टर