सॅमसंगच्या गॅलेक्सी S3 नियोच्या किमतीत 3,500 रुपयांची कपात

अॅपलच्या आयफोन ५सी आणि आसुसच्या जेनफोनच्या किमतीतील कपातीनंतर आता सॅमसंग इंडियानं सुद्धा आपल्या ग्राहकांना प्रजासत्ताक दिनाचं मोठं गिफ्ट दिलंय. सॅमसंगनं गॅलेक्सी एस ३ नियो स्मार्टफोनची किंमत साडे तीन हजार रुपयांनी कमी केलेत. 

Updated: Jan 20, 2015, 03:20 PM IST
सॅमसंगच्या गॅलेक्सी S3 नियोच्या किमतीत 3,500 रुपयांची कपात title=

नवी दिल्ली: अॅपलच्या आयफोन ५सी आणि आसुसच्या जेनफोनच्या किमतीतील कपातीनंतर आता सॅमसंग इंडियानं सुद्धा आपल्या ग्राहकांना प्रजासत्ताक दिनाचं मोठं गिफ्ट दिलंय. सॅमसंगनं गॅलेक्सी एस ३ नियो स्मार्टफोनची किंमत साडे तीन हजार रुपयांनी कमी केलेत. 

मागील वर्षी एप्रिलमध्ये लॉन्च झालेल्या गॅलेक्सी एस३ या स्मार्टफोनची किंमत १५,९९९ रुपयांवरून कमी होऊन १२,४९९ रुपये झालीय. हा फोन फ्लिपकार्ट आणि दुसऱ्या स्टोअर्समध्येही कमी झालेल्या किमतीनं उपलब्ध आहे.

फोनमध्ये ४.८ इंचचा सूपर AMOLED एचडी डिस्प्ले आहे. १.४ गीगाहर्त्झ क्वाड कोर प्रोसेसर (क्वालकॉम स्नॅपड्रॅगन), १.५ जीबी रॅम, १६ जीबी इंटरनल स्टोरेज आणि मायक्रो एसडी कार्ड स्लॉट आहे. 

यासोबतच फोनचा फ्रंट कॅमेरा ८ मेगापिक्सेल आहे आणि फ्रंट कॅमेरा १.९ मेगापिक्सेल आहे. फोनमध्ये ड्युएल सिम सपोर्ट आहे. ३जी सपोर्ट आणि २१००mAh बॅटरी आहे. S3 नियो अँड्रॉइड ४.३ जेली बीनवर चालतो आणि यासाठी अँड्रॉइड ४.४ किटकॅट अपडेट पण आलाय.

तसा तर हा स्मार्टफोन जुना आहे. पण फोनची स्पेसिफिकेशन्स या किमतीत मिळणारे दुसऱ्या फोन पेक्षा खूप जास्त आहेत. तेव्हा जर आपण सॅमसंग फोन्स पसंत करत असाल तर नव्या किमतीसह सॅमसंग गॅलेक्सी एस ३ नियो आपल्यासाठी खूप चांगलं ऑप्शन ठरू शकेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.