Imsha Rehman Viral Video: पाकिस्तानमधील टिकटॉक स्टार इमशा रहमानने (Imsha Rehman) आपली सोशल मीडियावरील खाती डिअॅक्टिव्हेट केली आहेत. आपला खासगी आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिने हा निर्णय घेतला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी तिच्यावर टीकेची भडीमार केला होता. प्रसिद्धी मिळवण्यासाठी तिनेच जाणुनबुजून व्हिडीओ व्हायरल केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. पण ती डेटा लीकची पीडित असल्याचं दिसत आहे. मिनाहिल मलिक नंतरचे हे दुसरं प्रकरण आहे ज्याचा तिच्या प्रियकरासह खासगी व्हिडिओ अलीकडेच समोर आला होता. तिच्या फॉलोअर्सनीही हा पब्लिसिटी स्टंट असल्याचा आरोप केला होता. या वादानंतर मलिकने इन्स्टाग्राम अकाऊंट बंद केले होते.
इमशा रहमानने आपलं खातं डिअक्टिव्हेट करण्याआधी आपण नकारात्मक कमेंट्सचा सामना करत असल्याचं सांगितलं. आपल्यावर होणारी टीका आश्चर्यकारक असल्याचं म्हटलं आहे. तिच्या खासगी व्हिडीओतील काही स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याचे मिम्सही तयार करण्यात आले आहेत.
इमशा रहमानने TikTok खात्यावरून आणखी एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जोपर्यंत व्हिडिओ व्हायरल आहे तोपर्यंत मी माझं खातं निष्क्रिय केलं आहे असं तिने त्यात सांगितलं आहे.
इमशा रहमान पाकिस्तानमध्ये खूप प्रसिद्ध आहे. आपल्या तिच्या आकर्षक कंटेंटसाठी ओळखली जाते. TikTok व्यतिरिक्त, रहमान इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील आहे.
स्थानिक वाहिन्यांना दिलेल्या मुलाखतींमध्ये रहमानने सांगितलं आहे की, तिचा जन्म 7 ऑक्टोबर 2002 रोजी झाला. तिचा जन्म आणि पालनपोषण लाहोरमध्ये झाले.
मिनाहिल मलिकचा तिच्या प्रियकरासोबतचा खासगी क्षणांचा व्हिडीओही अशाच प्रकारे सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ऑक्टोबर महिन्यात हा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तिने हा व्हिडिओ "बनावट" असल्याचा दावा केला आणि फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीकडे (एफआयए) तक्रार दाखल केली.
तथापि, सोशल मीडिया युजर्सनी तिच्यावर जाणूनबुजून व्हिडिओ लीक केल्याचा आरोप केल्यामुळे मलिकला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. पाकिस्तानी अभिनेत्री मिशी खानने एक व्हिडिओ जारी केला ज्यामध्ये तिने प्रसिद्धीसाठी इन्फ्लुएन्सर अत्यंत खालच्या स्तराला जात असल्याची टीका केली होती. तिने थेट मलिकचं नाव घेतलं नाही, पण निशाणा तिच्यावरच होता.