मुंबई : कोरियन कंपनी ‘सॅमसंग’नं आपल्या गॅलक्सी स्मार्टफोन सीरिजमध्ये आणखी एक स्मार्टफोन बाजारात उतरवण्याची घोषणा केलीय. हा स्मार्टफोन असेल ‘गॅलक्सी अल्फा’...
दमदार फिचर्ससोबतच या स्मार्टफोनचं वैशिष्ट्य असेल या फोनची स्लिम डिझाइन आणि मेटल बॉडिफ्रेम... या फोनच्या किंमतीबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
गॅलक्सी अल्फामध्ये 4.7 इंच स्क्रीन आणि 1.8 ऑक्टा कोअर प्रोसेसर उपलब्ध असेल. अँन्ड्रॉईड 4.4 किटकॅट ऑपरेटिंग सिस्टम बेस्ड या फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आणि 1.2 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल. लग्जरी लूक देण्यासाठी फोनच्या स्टायलिश मेटल बॉडीसोबत या स्मार्टफोनची जाडी असेल केवळ 6.7 मिमी..
कंपनीनं या स्मार्टफोनमध्ये फिंगर स्कॅनकर आणि बायोमेट्रिक स्क्रीन लॉकिंगची सुविधा दिलीय. सोबतच फोनच्या मागच्या बाजुला हार्ट रेट मॉनिटरसारखे फिचर्सही दिलेले आहेत. हा स्मार्टफोन जगभरातील 150 देशांमध्ये उपलब्ध होईल. पुढच्या महिन्यापासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असेल.
या स्मार्टफोनची टॅग लाईन आहे ‘the evolution of Galaxy Design’… सॅमसंगचा हा स्मार्टफोन ‘आयफोन 6’ ला जोरदार टक्कर देण्यीच चिन्हं आहेत. कंपनीनं हा फोन बुधवारी मॉस्कोमध्ये झालेल्या एका इव्हेंटमध्ये लॉन्च केलाय.
सॅमसंग ‘गॅलक्सी अल्फा’चे फिचर्स…
* डिस्प्ले : 4.7 इंच (720 X 1280 पिक्सल)
* प्रोसेसर : 1.8 GHz ऑक्टाच कोअर एक्जिनॉस
* रॅम : 2 जीबी
* स्टोसअरेज : 32 जीबी
* कॅमेरा : 12 मेगापिक्सल रीअर, 1.2 मेगापिक्सल फ्रंट
* बॅटरी: 1860 मेगाहर्टझ
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.