सॅमसंग 'गॅलेक्सी जे वन'चे फोटो आणि फिचर्स लिक

कोरियन कंपनी सॅमसंगच्या सर्वात स्वस्त स्मार्टफोन 'गॅलेक्सी जे वन'चे काही फोटो आणि काही फीचर लीक झालेत.

Updated: Jan 15, 2015, 04:26 PM IST
सॅमसंग 'गॅलेक्सी जे वन'चे फोटो आणि फिचर्स लिक title=

मुंबई : कोरियन कंपनी सॅमसंगच्या सर्वात स्वस्त स्मार्टफोन 'गॅलेक्सी जे वन'चे काही फोटो आणि काही फीचर लीक झालेत.

एका वेबसाईटनं नंबर 'एसएम-जे१००'च्या नावानं या हॅन्डसेटचे फोटो आणि फिचर उघड केले आहेत. यामध्ये दिलेल्या माहितीनुसार, हा एक स्वस्त स्मार्टफोन असेल. या फोनची स्क्रीन ४.३ इंचाची असेल. या मोबाीलचं इजोल्युशन ४८० X ८०० पिक्सल असेल.

या फोनमध्ये १.२ जीएचझेड ६४ बिट क्वॉड कोअर मार्वेल प्रोसेसर असेल. तसंच यामध्ये अँन्ड्रॉईड ४.४ ऑपरेटींग सिस्टम आहे. तसंच यामध्ये १ जीबी  रॅम उपलब्ध असेल. या फोनचा रिअर कॅमेरा ५ मेगापिक्सल आहे. 

हा फोन गॅलेक्सी सीरिजचा असू शकतो, असं म्हटलं जातंय आणि इतर गॅलेक्सी स्मार्टफोनमध्ये आढळणारे फीचर्स यामध्येही आढळतील. या फोनची अधिकृत घोषणा पुढच्या आठवड्यात होणार आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.