मुंबई: कोरियन कंपनी सॅमसंगनं भारतात मेड इन इंडिया गॅलेक्सी टॅब एस 2 लॉन्च केलाय. सॅमसंगच्या मते हा जगातील सर्वात स्लीम टॅबलेट आहे. 4G बेस्ड हा टॅबलेट फक्त 5.6 एमएम आहे आणि त्याचं वजन फक्त 392 ग्राम आहे. तर किंमत 39,400 रुपये आहे.
आणखी वाचा - सॅमसंगचा नवा स्मार्टफोन Galaxy J1 Ace अवघ्या 6,400 रुपयांत!
या टॅबलेटमध्ये व्हॉइस कॉलिंगची सुद्धा सुविधा आहे. हे टॅबलेट काही महिन्यांपूर्वी जगात लॉन्च झालाय. तो आता भारतीय बाजारमध्ये उपलब्ध असेल. सॅमसंग हा टॅब विकत घेणाऱ्यांना दोन महिन्यांसाठी 2 जीबी 4G डेटा मोफत मिळणार आहे. यासाठी सॅमसंगनं एअरटेलसोबत करार केलाय.
Galaxy S2 टॅबचे खास फीचर्स
स्क्रीन - 9.7 इंच
प्रोसेसर - ऑक्टा कोर
बॅटरी - 5870 mAh नॉन-रिम्हूवेवल, 5.6mm, 392 ग्राम
रॅम: 3 GB
मेमरी: 32 GB, (एक्सपेंडेबल 128 GB)
कॅमेरा: 8MP ऑटो फोकस, रिअर कॅमरा 2.1 MP
नेटवर्क: 4G, 3G, 2G
रंग: व्हाइट, ब्लॅक आणि गोल्ड.
आणखी वाचा - सुपर-स्लिम स्मार्टफोन ओप्पो R5s लॉन्च!
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.