मुंबई: नुकतेच एअरटेल आणि आयडियानं आपले डेटा चार्जेस वाढवले आहेत. टेलिकॉम कंपन्यांच्या या कृतीचा सर्वात मोठा परिणाम स्मार्टफोन यूजर्सवर पडतोय, जे दररोज इंटरनेट वापरकाक. जर आपण काही अशा ट्रिक्स शोधल्या ज्यामुळं इंटरनेटचा वापर थोडा कमी करून मोबाईल बिल कंट्रोलमध्ये ठेवू शकतो.
स्मार्टफोनमध्ये काही डेटा हंगरी अॅप असतात. म्हणजे जे अॅपल आपल्या मोबाईलचा डेटा जास्त वापरतात आणि जास्त बॅटरीही खर्च होते. डेटा यूज कमी करण्याचा दावा करणारे असंख्य अॅप्स आपल्याला मिळतील. पण जवळपास सर्व अॅप आपला स्मार्टफोन स्लो करण्याचं काम करतात. असे अॅप मालवेअरनं अफेक्टेड असतात जे फोन हँगही करतात.
आणखी वाचा - Important: इमर्जन्सी असतांना लॉक न उघडता स्मार्टफोनमध्ये अशी दिसेल माहिती
आम्ही आपल्याला काही ट्रिक्स सांगतो ज्याच्या मदतीनं आपण डेटा यूज कमी आणि इंटरनेटचा जास्त वापर करू शकतो. यासाठी आपल्याला कोणतंही थर्ड पार्टी अॅपचीही गरज नाही कारण पैसे तर असेही वाचतील.
वापरून पाहा या ट्रिक्स-
1. क्रोम ब्राउजरचा डेटा सेवर ऑन करा - आपल्याला माहितीय का की, मोबाइलच्या क्रोम ब्राउजरमध्ये डेटा सेव्हरचं ऑप्शन पण आहे. आपण क्रोम ब्राउजरचं सेटिंग्जमध्ये जावून 'Data Saver' ऑन करावं, जे पहिलेपासून ऑफ असतं. यामुळं वेबपेज कॉप्रेस करून डेटा वाचवतो.
2. फेसबुक व्हिडिओ प्ले - स्मार्टफोनमध्ये फेसबुक अॅपसोबत फेसबुक व्हिडिओ प्लेचं ऑप्शन नेहमी ऑन राहतं. त्यामुळं फेसबुक उघडताच फेसबुक अॅप अधिक स्पीडनं डेटा खर्च करणं सुरू करतो. त्याला डिसेबल करण्यासाठी फेसबुक अॅप उघडून त्याच्या सेटिंगमध्ये Videos Auto-play ऑफ करावं किंवा Wi-Fi Only करावं.
3. ऑटो अपडेट होणारे अॅप डिसेबल करा - काही अॅप इंटरनेट मिळताच स्वत:हून अपडेट होणं सुरू करतात. ते कमी करण्यासाठी गुगल प्ले स्टोरच्या सेटिंग्समध्ये जावून 'Do Not Auto-Update Apps' किंवा 'Auto update over WiFi Only' करावं.
4. रेस्ट्रिक्ट बँकग्राउंड डेटा - अँड्रॉइडचं हे फीचर डेटा यूजर कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. आपल्याला मोबाइल डेटा यूजच्या सेटिंग्जमध्ये जावून 'Restrict background data' सिलेक्ट करावं आणि नंतर बँकग्राउंड अॅप आपणहून बंद होतील.
5. अॅपचं पुश कटेंट डिसेबल ठेवा - चॅटिंग अॅप असो किंवा फेसबुक सर्व अॅप्समध्ये पुश कटेंट ऑप्शन डिफॉल्ट असतं. अॅपच्या सेटिंग्जमध्ये जावून पुश नोटिफिकेशन बंद करावं.
6. आणि शेवटचं म्हणजे कोणतंही अॅप उघडल्यानंतर ते व्यवस्थित बंद करावं. अॅप मिनिमाइज करून सोडू नये. या ट्रिक्स वापरल्यास आपण डेटा वाचवू शकतो आणि आपला स्मार्टफोन आधीपेक्षा फास्ट होईल.
आणखी वाचा - ६ मिनीटांत करा स्मार्टफोन फुल्ल चार्ज, सोबत मिळवा ७ दिवसांचा बॅकअप
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.