सॅमसंगचं छोटं पॅकेज : 'गॅलक्सी एस ५ मिनी'

सॅमसंगनं आपला नवा कोरा 'गॅलक्सी एस ५ मिनी' बाजाराच्या स्पर्धेत उतरण्यासाठी तयार आहे. कंपनीनं आपल्या टॉप स्मार्टफोनचे सगळे फिचर्स 'एस ५ मिनी'च्या माध्यमातून छोट्या साईजमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिलेत. 

Updated: Jul 2, 2014, 05:02 PM IST
सॅमसंगचं छोटं पॅकेज : 'गॅलक्सी एस ५ मिनी' title=

मुंबई : सॅमसंगनं आपला नवा कोरा 'गॅलक्सी एस ५ मिनी' बाजाराच्या स्पर्धेत उतरण्यासाठी तयार आहे. कंपनीनं आपल्या टॉप स्मार्टफोनचे सगळे फिचर्स 'एस ५ मिनी'च्या माध्यमातून छोट्या साईजमध्ये ग्राहकांना उपलब्ध करून दिलेत. 

गॅलक्सी एस ५ हा सध्याचा सॅमसंगचा स्मार्टफोन सगळ्यात टॉपवर आहे. यातील फिंगरप्रिंट सेन्सर, अल्ट्रा पॉवर सेव्हिंग मोड आणि हार्ट रेट मॉनिटर या 'मिनी' स्मार्टफोनमध्येही उपलब्ध करून दिलेत. हा फोन IP67 सर्टिफाईड आहे. म्हणजेच हा फोन वॉटर आणि डस्ट प्रूफ आहे. या फोनमध्ये मायक्रो यूएसबीसारखे फिचर्सही उपलब्ध आहेत.  
 
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, ग्लोबल रिलीजनंतर या महिन्याच्या अखेरीस हा स्मार्टफोन रशियामध्ये लॉन्च केला जाईल. या मोबाईलची किंमत मात्र अजून कंपनीनं गुलदस्त्यातच ठेवलीय. हा फोन ब्लॅक, शिमरी व्हाईट, इलेक्ट्रिक ब्लू आणि कॉपर गोल्ड कलर मध्ये उपलब्ध असेल. 

'गॅलक्सी एस ५ मिनी'ची वैशिष्ट्ये...   

- स्क्रीन - ४.५ इंच ७२०P एचडी स्क्रीन

- कॅमेरा - ८ मेगापिक्सल बॅक कॅमेरा आणि २.१ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा, एलईडी फ्लॅशसहीत

- प्रोसेसर - १.४ गीगाहर्टझ क्‍वाड कोर 

- रॅम - १.५ जीबी 

- स्टोरेज - १६ जीबी (६४ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते)

- बॅटरी - २१०० एमएच

- कनेक्टिव्हिटी - टू जी, थ्री जी, फोर जी, वाय-फाय, ब्लू टूथ ४.०

- ऑपरेटिंग सिस्टम - अँन्ड्रॉईड किटकॅट ४.४ 

- इतर फिचर्स - एसीलेरोमीटर, डिजिटल कंपास, गायरो, प्रॉक्झिमिटी, ए-जीपीएस, आयआर रिमोट आणि अॅम्बिएन्ट लाईट सेन्सर 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.