मुंबई : सॅमसंगने आपला नवा स्मार्टफोन बाजारात आणलाय. ‘गॅलेक्सी नोट 4’असं या नव्या फोनचे नाव आहे. भारतीय बाजारपेठेत हा फोन पुढील महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये येणार आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात नवा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध झालाय. दरम्यान, या स्मार्टफोनची किंमत कंपनीने जाहीर केलेली नाही.
3.7 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. कॅमेरा मुव्हेबल असल्याने फ्रंट कॅमेऱ्याचा अँगल 77 अंशांनी वाढवून 90 अंश करण्यात आला आहे. या फोनच्या मागील बाजूला असलेल्या शटर बटणामुळे सिंगल क्लिक फोटो काढता येणार आहेत. ब्लॅक, व्हाईट, गोल्डन आणि पिंक कलरमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध होणार आहे.
काय आहे या फोनमध्ये
- आकर्षक डिझाईन, डिस्प्ले 5.7 इंच क्वॉड एचडी सुपर आलमंड स्क्रीन
- एकाच स्क्रीनवर अनेक विण्डो पाहता येणार आहेत.
- ‘गॅलेक्सी नोट 4’ हा 2.5 डी ग्लाससह बाजारात
- स्क्रॅचेसपासून या फोनचे संरक्षण
- फोनचे वजन 176 ग्रॅम आहे.
- बॉडी 8.5 मीमी पातळ आहे.
- 16 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा
- 3.7 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
- ब्लॅक, व्हाईट, गोल्डन आणि पिंक कलरमध्ये उपलब्ध
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.