स्टेट बँकेत ६४२५ जागांची भरती

 भारतीय स्टेट बँक (State Bank Of India) ग्रुपमध्ये लिपिक पदांच्या ६४२५ जागांसाठी भरती करण्यात येणार आहेत. या पदांसाठी भारतीय नागरिकाने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया २० नोव्हेंबरपासून सुरू होऊन येत्या ९ डिसेंबर पर्यंत अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरू शकतात.

Updated: Nov 19, 2014, 07:31 PM IST
स्टेट बँकेत ६४२५ जागांची भरती  title=

नवी दिल्ली :  भारतीय स्टेट बँक (State Bank Of India) ग्रुपमध्ये लिपिक पदांच्या ६४२५ जागांसाठी भरती करण्यात येणार आहेत. या पदांसाठी भारतीय नागरिकाने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया २० नोव्हेंबरपासून सुरू होऊन येत्या ९ डिसेंबर पर्यंत अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरू शकतात.

यात जागा ६४२५ जागा या पुढील शाखांमध्ये आहेत. 
स्टेट बँक ऑफ म्हैसूर - ७२५ जागा
स्टेट बँक ऑफ पतियाळा - १२०० जागा
स्टेट बँक ऑफ त्रावणकोर - १३०० जागा
स्टेट बॅंक ऑफ बिकानेर आणि जयपूर- १००० जागा
स्टेट बँक ऑफ हैदराबाद - २२०० जागा

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख -9 डिसेंबर 2014 (सुरूवात 20 नोव्हेंबर 2014 )

वय मर्यादा – अर्जदार १-१२-२०१४ रोजी २० ते २८ वयोगटातील असावा. अर्जदाराचा जन्म १-१२-१९८६ ते १-१२-१९९४ या कालवधीत झालेला असावा. वयोमर्यादाची अट शीत ही नियमानुसार होणार आहे.

 
शैक्षणिक पात्रता - पदवीधर किंवा समकक्ष, अर्जदाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समकक्ष पदवी घेतलेली असावी. ही पदवी केंद्र आणि सरकारकडून मान्यता प्राप्त असावी.

निवड प्रक्रिया – ऑनलाइन टेस्टच्या माध्यमातून निवड होणार आहे. ( सामान्य ज्ञान, सामान्य इंग्लिश आणि इतर घटक) आणि मुलाखत यांचा समावेश आहे.

 
अर्ज शुल्क – सामान्य आणि ओबीसी प्रवर्गातील अर्जदाराने ६०० रुपये तर एसी/एसटी/पीडब्ल्यूडी/एक्सएस अर्जदारांना १०० रुपये शुल्क ऑनलाइन किंवा ऑफलाइन भरावे लागणार आहे. 

अर्ज कसा करणार – भारतीय नागरिकाने www.statebankofindia.com  किंवा www.sbi.co.in या वेबसाइटवर 20-11-2014 ते 09-12-2014 या कालावधीत करावा. 

 

Bank

Vacancies

   PWD

EXS  

 

SC

ST

OBC

GEN

Total

VI

HI

OH

XS

DXS

SBM

116

50

196

363

725

7

8

7

72

33

SBP

307

26

271

596

1200

12

22

13

240

54

SBT

158

20

 348

 774

1300

13

12

14

130

58

SBB&J

162

120

207

511

1000

11

29

10

98

40

SBH

305

197

641

1057

2200

20

20

20

204

92

Total

1048

413

1663

3301

6425

63

91

64

744

277

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.