VIDEO : या मुलांना मिळणार का त्यांचा अधिकार?

ही गोष्ट आहे मंगूची...जो अनाथ आहे मात्र तो कधीही भीक मागत नाही...शाळा शिकण्याच्या वयात त्याला पोटाची खळगी भरण्यासाठी काम करावे लागतेय. तो केवळ काम शोधतोय...इकडे तिकडे भरकटतोय... ही विदारक परिस्थिती आहे भारताततली. 

Updated: Nov 29, 2015, 03:17 PM IST
VIDEO : या मुलांना मिळणार का त्यांचा अधिकार? title=

मुंबई : ही गोष्ट आहे मंगूची...जो अनाथ आहे मात्र तो कधीही भीक मागत नाही...शाळा शिकण्याच्या वयात त्याला पोटाची खळगी भरण्यासाठी काम करावे लागतेय. तो केवळ काम शोधतोय...इकडे तिकडे भरकटतोय... ही विदारक परिस्थिती आहे भारताततली. 

आजही देशात तब्बल दीड कोटीहून अधिक मुले शिक्षणावाचून आहेत. तेही मंगूसारखेच जीवन जगतायत. त्यांना गरज आहे शिक्षणाची... मंगूसारखाच त्यांनाही मिळेल का शिक्षणाचा अधिकार...

 

Mangu | Shortfilm 2015

Let's turn hope into blessings. Let's empower Mangu. Will you stand by us?

Posted by Postpickle on Saturday, November 28, 2015

 

 

आपल्या सरकारने शिक्षण अधिकार कायदा तर बनवला खरा मात्र कायदा बनवल्यानंतरही परिस्थिती बदललीये का? हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नक्कीच नाही असे उत्तर मिळेल. मग आपणच नको का हे बदलायला. अशा  लाखो मंगूंच्या पाठीमागे आपण नको का उभे राहायला?

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.