केवळ एका रुपयात खरेदी करा शानदार 'स्कोडा'

गाडी खरेदी करायचीय पण खिशात मात्र खणखणाट आहे... अशा ग्राहकांसाठी कार निर्माता कंपनी 'स्कोडा'नं एक धम्माल स्कीम लॉन्च केलीय. कंपनीनं केवळ एका रुपयांत कार विकण्याची घोषणा केलीय.

Updated: Jun 9, 2015, 05:36 PM IST
केवळ एका रुपयात खरेदी करा शानदार 'स्कोडा'

मुंबई : गाडी खरेदी करायचीय पण खिशात मात्र खणखणाट आहे... अशा ग्राहकांसाठी कार निर्माता कंपनी 'स्कोडा'नं एक धम्माल स्कीम लॉन्च केलीय. कंपनीनं केवळ एका रुपयांत कार विकण्याची घोषणा केलीय.

प्रीमियम कार निर्माता कंपनी स्कोडा ऑटो इंडियानं आपल्या गाड्यांच्या विक्रीत वाढ करण्यासाठी हा निर्णय घेतलाय. कंपनीनं 'ईएमआय हॉलिडे ऑफर'मार्फत कंपनीच्या 'रॅपिड' आणि 'सुपर्ब' गाड्या केवळ एक रुपयांच्या 'ईएमआय'वर विकण्याची स्कीम लॉन्च केलीय. 

या स्कीम अंतर्गत गाडी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना पहिले सहा महिने केवळ एक रुपयांचा ईएमआय द्यावा लागेल. या स्कीममध्ये ८४ महिन्यांसाठी गाहकांना ईएमआय चुकवावा लागणार आहे. तसंच ग्राहकांसाठी वाहन कर्ज व्यवस्थाही कंपनीकडून करण्यात आलीय. यासाठी ७.९९ टक्के व्याज आकारण्यात येईल. 

याशिवाय कंपनी स्पोर्टस युटिलिटी वाहनांसाठी ७ टक्के व्याजावर कर्ज उपलब्ध करून देणार आहे. यासाठी पाच वर्षांपर्यंत मासिक हप्ता भरावा लागेल.

रॅपिडच्या ग्राहकांना चार वर्षांची वॉरंटी आणि प्रवासा दरम्यान दिल्या जाणाऱ्या मदतीतही अधिक दोन वर्षांची ऑफर मिळणार आहे. 

ही सुविधा कंपनीच्या सिटिगो आणि ऑक्टेव्हिया यांसारख्या गाड्यांसाठी लागू नसेल.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.