१५ मिनिटं चार्ज केल्यावर ही गाडी ४५० किमी धावणार

कार निर्मितीत नावाजलेली कंपनी  स्कोडा बॅटरीवर चालणारी एसयूव्ही कारची निर्मिती करणार आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या कारची चर्चा यासाठी आहे कारण, ही कार १५ मिनिटं चार्ज केल्यानंतर ४५० किमीपर्यंत धावणार आहे.

Updated: Jul 6, 2016, 11:04 AM IST
१५ मिनिटं चार्ज केल्यावर ही गाडी ४५० किमी धावणार title=

मुंबई : कार निर्मितीत नावाजलेली कंपनी  स्कोडा बॅटरीवर चालणारी एसयूव्ही कारची निर्मिती करणार आहे. बॅटरीवर चालणाऱ्या या कारची चर्चा यासाठी आहे कारण, ही कार १५ मिनिटं चार्ज केल्यानंतर ४५० किमीपर्यंत धावणार आहे.

स्कोडाच्या एसयूव्हीची निर्मिती फॉक्सवेगनच्या एमईबी बॅटरी प्लॅटफॉर्मवरच  केली जाणार आहे.  फॉक्सवेगन कंपनीही स्कोडासोबत आगामी काळात प्रीमियम आणि हाय परफॉर्मन्स इलेक्ट्रिक कार बाजारात आणू शकते, असं म्हटलं जातंय.

स्कोडा कंपनी २०२० साली ही एसयूव्ही लॉन्च करणार आहे, २०२५ सालापर्यंत ३० नव्या इलेक्ट्रिक आणि हायब्रिड कार आणण्याच्या विचारत स्कोडा कंपनी आहे. २०१९ पर्यंत स्कोडा सुपर्ब नव्या कोडिएक एसयूव्हीचे हायब्रिड व्हर्जन आणणार आहे.

ही कार पेट्रोल-डिझेलवर चालणारी नसेल तर या गाडीचे किंमत जास्त असेल असं तुम्हाला वाटत असेल, पण पेटोल-डिझेल कारच्या किंमतींपेक्षा या एसयूव्हीची किंमत कमी असेल.