स्मार्टफोन उघडणार तुमच्या घराचं टाळं...

जर तुमच्या घराच्या दरवाजाच्या टाळ्याची चावी हरवली तर... जास्त त्रास करून घेऊ नका... कारण तुम्ही चावी विसरलात तरी तुमच्या स्मार्टफोनच्या साहाय्यानं आता तुम्ही हे टाळं उघडू शकाल...

Updated: Apr 7, 2015, 10:57 AM IST
स्मार्टफोन उघडणार तुमच्या घराचं टाळं...  title=

न्यूयॉर्क : जर तुमच्या घराच्या दरवाजाच्या टाळ्याची चावी हरवली तर... जास्त त्रास करून घेऊ नका... कारण तुम्ही चावी विसरलात तरी तुमच्या स्मार्टफोनच्या साहाय्यानं आता तुम्ही हे टाळं उघडू शकाल...

होय, स्मार्टफोन, स्मार्टवॉचनंतर आता स्मार्टलॉक तुमच्या घराची सुरक्षा करण्यासाठी सज्ज झालंय. ऑगस्टा नावाच्या कंपनीनं हे स्मार्टलॉक बनवलंय. यासाठी तुम्हाला केवळ आपल्या स्मार्टफोनमध्ये एक अॅप्लिकेशन डाऊनलोड करावं लागेल. 

या मोबाईल अॅपमध्ये रजिस्टर्ड असणाऱ्या व्यक्तींनाच हे टाळं उघडता येईल. म्हणजे, या अॅपमध्ये रजिस्टर्ड असलेला तुमच्या कुटुंबातील इतर कोणताही सदस्य आपल्या स्मार्टफोनचा वापर करून हे टाळं सहज उघडू शकतो. 

या अॅपमध्ये एक खास कोड टाकावा लागतो. हा कोड केवळ एक व्यक्ती तयार करू शकतो. 

'ऑगस्टा'नं बनवलेल्या या टाळ्याची किंमत आहे २५० अमेरिकन डॉलर आणि या अॅपला इन्स्टॉल करण्यासाठी जवळपास तेवढेच पैसे द्यावे लागतील. 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.