'फेसबुक'च्या अॅपमध्ये 'व्हॉटसअप'चाही समावेश

व्हॉटसअप आणि फेसबुक युझर्ससाठी ही एक खुशखबर... आता फेसबुक आणि व्हॉटसअप वापरण्यासाठी तुम्हाला एकच 'अॅप' तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करावं लागणार आहे.

Updated: Apr 6, 2015, 06:11 PM IST
'फेसबुक'च्या अॅपमध्ये 'व्हॉटसअप'चाही समावेश title=

मुंबई : व्हॉटसअप आणि फेसबुक युझर्ससाठी ही एक खुशखबर... आता फेसबुक आणि व्हॉटसअप वापरण्यासाठी तुम्हाला एकच 'अॅप' तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करावं लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फेसबुक आपल्या मोबाईल अॅपमध्ये व्हॉटसअपचाही समावेश करणार आहे.... ही योजना प्रत्यक्षात आली तर फेसबुकच्या माध्यमातून व्हॉटसअपवर मॅसेज पाठवता येऊ शकेल. 

फेसबुक अॅपच्या लेटेस्ट व्हर्जनमध्ये काही युझर्सनं स्टेटस अपडेटसच्या अॅक्शन बटन्समध्ये व्हॉटसअपसारख्या आयकॉनवाला 'सेन्ड' बटन नोटिस केलंय. यासाठी तुम्हाला वेगळं व्हॉटसअप ओपन करण्याची गरज भासणार नाही. 

यामध्ये, फेसबुकचं स्टेटस अपडेट केल्यानंतर खाली लाईक, कमेंट, शेअर या ऑप्शन्ससोबतच 'सेन्ट'चंही बटन असेल. यामध्ये, व्हॉटसअपचा आयकॉन दिला गेलाय. 

म्हणजेच, तुम्ही तुमची कोणतीही फेसबुक पोस्ट आपल्या व्हॉटसअप कॉन्टॅक्टला पाठवू शकता. हे बटन खाली शेअरच्या बाजुला उपलब्ध असेल. 

फेसबुक अॅपचं हे फिचर अजूनही 'टेस्टिंग' अवस्थेतच आहे. त्यामुळे, हे अजूनपर्यंत काही ठराविक यूझर्सलाच उपलब्ध करून देण्यात आलंय. या फिचरची अद्याप कोणतीही अधिकृतरित्या घोषणा केलेली नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.