स्मार्टफोनमध्ये ड्युएल रिअर कॅमेऱ्याचं काय काम? जाणून घ्या...

सध्या बाजारात चलती आहे ती ड्युएल रिअर कॅमेरा असणाऱ्या स्मार्टफोन्सची... पण, तुम्हाला स्मार्टफोनमध्ये ड्युएल रिअर कॅमेराची काय गरज? किंवा हे ड्युएल कॅमेरा कसे काम करतात? असा कधी प्रश्न पडलाय का? असेल तर त्याचंच हे उत्तर...

Updated: Jan 31, 2017, 01:38 PM IST
स्मार्टफोनमध्ये ड्युएल रिअर कॅमेऱ्याचं काय काम? जाणून घ्या...  title=

मुंबई : सध्या बाजारात चलती आहे ती ड्युएल रिअर कॅमेरा असणाऱ्या स्मार्टफोन्सची... पण, तुम्हाला स्मार्टफोनमध्ये ड्युएल रिअर कॅमेराची काय गरज? किंवा हे ड्युएल कॅमेरा कसे काम करतात? असा कधी प्रश्न पडलाय का? असेल तर त्याचंच हे उत्तर...

ड्युएल रिअर कॅमेरा

ड्युएल रिअर कॅमेऱ्यामुळे फोटोंची क्वालिटी साधारण: डीएसएलआर सारखीच दिसते... हे फोटो स्मार्टफोनने काढलेत असं बऱ्याचदा दिसूनही येत नाही. काहींच्या म्हणण्यानुसार, हे फोटो बऱ्याचदा थ्री डी फोटोंप्रमाणे दिसतात. 

त्याचं कारण म्हणजे, स्मार्टफोनच्या मागच्या बाजुला दोन कॅमेरे एकत्रच काम करतात तेव्हा एका सॉफ्टवेअरच्या मदतीनं हे दोन्ही फोटो आपोआप एकत्र होतात. डीएसएलआरप्रमाणेच आजुबाजुच्या गोष्टी ब्लर करून एखादी गोष्ट फोकस करायची असल्यास तसंच तुम्ही या स्मार्टफोनमध्ये करू शकतात. 

प्रत्येक कंपनी आपल्या ड्युएल कॅमेऱ्यांत वेगवेगळे इफेक्ट देतात. एक लेन्स असलेल्या कॅमेऱ्यांत फोकस लवकर सेट होत नाही... त्यामुळे कंपन्यांनी आपल्या स्मार्टफोन्समध्ये दोन लेन्सेस वापरून फोटो प्रिय ग्राहकांना आणखी खुश करण्याचा प्रयत्न केलाय. यामध्ये तुम्ही अपर्चरही तुम्हाला हवा त्या पद्धतीनं सेट करू शकता. 

सध्या बाजारात, एलजी एक्स कॅम 580, कूलपॅड कूल 1, लेनोवोचा फॅब 2 प्रो अशा स्मार्टफोन्समध्ये ड्युएल रिअर कॅमेऱ्याची सुविधा उपलब्ध आहे.