10 वीचा निकाल पाहण्यासाठी वेबसाईट

ज्याची सर्वानाच आतुरता असते त्या दहावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे.

Updated: Jun 6, 2016, 08:50 AM IST
10 वीचा निकाल पाहण्यासाठी वेबसाईट title=

पुणे : ज्याची सर्वानाच आतुरता असते त्या दहावीच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल ६ जून रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.

१५ जून रोजी विद्यार्थ्यांना रिझल्ट शाळेमध्ये दुपारी ३ वाजता मिळणार आहेत. या वर्षी जवळपास १६ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यामुळे निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा आता संपली आहे. खाली दिलेल्या ४ संकेतस्थळावर तुम्ही निकाल पाहू शकता.

निकाल पाहण्यासाठी क्लिक करा

www.mahresult.nic.in

www.result.mkcl.org

www.maharashtraeducation.com

www.rediff.com/exams