लवकरच दहावी, बारावीचा निकाल जाहीर होणार

दहावी, बारावीच्या परीक्षा दिलेल्या मुलांना तसेच त्यांच्या कुटुबियांना आता उत्सुकता असेल ती निकालाची. यंदाच्या वर्षी तब्बल १४ लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. तर १७हून अधिक लाख विद्यार्थ्यी १०वीच्या परीक्षेसाठी पात्र ठरले होते. 

Updated: Apr 5, 2016, 12:47 PM IST
लवकरच दहावी, बारावीचा निकाल जाहीर होणार title=

मुंबई : दहावी, बारावीच्या परीक्षा दिलेल्या मुलांना तसेच त्यांच्या कुटुबियांना आता उत्सुकता असेल ती निकालाची. यंदाच्या वर्षी तब्बल १४ लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. तर १७हून अधिक लाख विद्यार्थ्यी १०वीच्या परीक्षेसाठी पात्र ठरले होते. 

२२ मार्च रोजी दहावीची परीक्षा संपली तर १६ मार्चला बारावीची परीक्षा संपली होती. गेल्या वर्षी मे महिन्यात १० आणि १२वीचा निकाल जाहीर करण्यात आला होता. यंदाही त्याच कालावधीत दोन्ही परीक्षांचे निकाल जाहीर होण्याची अपेक्षा आहे. मंडळानेही गेल्यावर्षीप्रमाणेच यंदाही वेळेत निकाल लागेल अशी ग्वाही दिलीये. 

mahahsscboard.maharashtra.gov.in या साईटवर हा निकाल जाहीर केला जाणार आहे.