www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यातल्या सर्व शाळांमध्ये उन्हाळी आणि दिवाळीच्या सुट्यांमध्ये सुसूत्रता यावी यासाठी संचालनालयातर्फे सुट्यांचं नियोजन करण्यात येतंय. यासाठी 2014-15 या शैक्षणिक वर्षाची सुरूवात 16 जूनपासून सुरू होणार आहे.
हे नियोजन करताना जून 2014 ते 2015 या कालावधीचा विचार केला जात आहे. यानुसार शाळांची सुट्टी 2 मे पासून सुरू होणार आहे.
दरवर्षी गणेशोत्सव आणि नाताळच्या सुट्यांवरून वादावादी होते. यामुळे शाळांनी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी यांची परवानगी घेऊन या सुट्या ठरवाव्यात असंही आदेशात म्हटलंय.
वर्षाला कामाचे दिवस 230 असून सुट्या 76 पेक्षा जास्त होणार नाहीत, असंही आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे.
शाळांचं पहिलं सत्र 16 जून ते 19 ऑक्टोबर या कालावधीत असणार आहे. यानंतर दिवाळीची सुट्टी 20 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर या कालावधीत असणार आहेत. त्यानंतर 7 नोव्हेंबर ते 1 मे या कालावधीत दुसरं सत्र होणार आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.