मुंबई : ह्यूस्टन : ज्यांना चंद्राविषयी कुतुहल आहे, चंद्राचं सौंदर्य न्याहाळायचं आहे, तसेच खगोलशास्त्रात रस असणाऱ्यांसाठी ही सर्वात महत्वाची बातमी आहे. आज चंद्र पृथ्वीच्या अधिक जवळ आल्याने सूपरमून पाहण्याचा तुम्हाला आनंद घेता येणार आहे.
आजची रात्र सर्वासाठी खास असणार आहे, कारण पौर्णिमाच्या या रात्री चंद्र ३० टक्के अधिक तेजस्वी दिसणार आहे, पृथ्वीपासून सर्वात जवळच्या अंतरावर चंद्र असणार असल्याने, चंद्र आपल्याला १४ टक्के मोठा दिसणार आहे.
रविवारी रात्री दहावाजेपासून ही घटना पाहता येणार आहे. मागील वेळेस ३२ वर्षांपूर्वी १९८२ मध्ये असं झालं होतं. मात्र यावेळेस सुपरमून हा गुजरात आणि राजस्थानच्या काही भागातच दिसणार आहे. मात्र तुम्ही कुठेही असले तरी चंद्राचं सौंदर्यं पाहण्याचा प्रयत्न करा.
परदेशात चंद्रग्रहणचा रंग लालसर दिसणार आहे, या परिस्थितीला ब्लड मून असं देखील म्हटलं जातं. चंद्रग्रहण झाल्यानंतर पूर्ण प्रकाश चंद्रापर्यंत न पोहचू शकल्याने, चंद्राचा रंग लाल होतो.
२०५२ मध्ये शतकातला सर्वात मोठा सुपरमून
पुढील वर्षी १४ नोव्हेंबरमध्ये सुपरमून दिसल्यानंतर, पुढील सूपरमून २०३३ मध्ये दिसणार आहे. शतकातला सर्वात मोठा सूपरमून २०५२ मध्ये दिसणार आहे, यावेळी शंभर वर्षात चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असणार आहे.
Step #1: Learn from a pro. Our photographer gives tips to capture the #SuperBloodMoon on Sun.: http://t.co/DjcAcQx7a3 pic.twitter.com/HPaA0bzBFY
— NASA (@NASA) September 26, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.