नवी दिल्ली : देशातील अग्रणीच्या कार उत्पादन कंपनी टाटा लवकरच एक नवीन गाडी बाजारात आणणार आहे. ही गाडी त्यांच्या मालकीची असलेल्या जॅग्वॉर लँड रोव्हर या कंपनीतर्फे बाजारात उतरवली जाणार आहे. 'जॅग्वॉर एफ टाइप एसव्हीआर' या नावाने ही गाडी बाजारात येईल. मार्च मध्ये जेनेव्हा मोटर शो मध्ये ही गाडी पहिल्यांदा पहायला मिळेल.
गाडीचा वेग
या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे ही गाडी २०० मैल प्रति तास (३२२ किलोमीटर प्रति तास) इतक्या वेगाने धावू शकेल. कंपनीच्या म्हणण्यानुसार ही गाडी जेनेव्हा मोटर शो मध्ये उतरवल्यानंतर साधारण मे महिन्याच्या आसपास विक्रीसाठी उपलब्ध होईल.
ही गाडी रोज वापरता येईल
हा गाडी कंपनीने रोजच्या वापरासाठी बनवली असल्याचं कंपनीचं मत आहे. या गाडीची बॉडी अॅल्युमिनिअमची बनली असून ती २ सीटर कार आहे. त्यामुळे ही गाडी जास्तीत जास्त हलकी झाली असून तिचा वेग चांगला झाला आहे. आरामदीयीपणा आणि इतर अनेक फीचर्स देण्यात आलेत. तसेच या नव्या फीचर्समुळे गाडीचा लूकही छान आहे.
गाडीची किंमत
कंपनीने इतक्यात तरी गाडीच्या किंमतीविषयी काही घोषणा केलेली नाही. तसेच इतर बाबींविषयीसुद्धा काही माहिती उघड केलेली नाही. १७ जानेवारीला या गाडीबद्दल आणखी माहिती आणि फोटो कंपनी प्रसिद्ध करेल अशी माहिती आहे.