लॉन्च झाली 'टाटा'ची GenX Nano!

टाटाची नॅनो कार आता नव्या लूकमध्ये समोर येत आहे. टाटानं जनरेशन नेक्स्ट एक्स प्रकारातील नॅनोचे 5 नवीन मॉ़डेल बाजारात लाँच केले आहेत. 

Updated: May 19, 2015, 07:48 PM IST
लॉन्च झाली 'टाटा'ची GenX Nano! title=

मुंबई: टाटाची नॅनो कार आता नव्या लूकमध्ये समोर येत आहे. टाटानं जनरेशन नेक्स्ट एक्स प्रकारातील नॅनोचे 5 नवीन मॉ़डेल बाजारात लाँच केले आहेत. 

या गाडीची किंमत 2 लाख ते 3 लाखाच्या घरात आहे. या नवीन गाडीत इंधन टाकीची क्षमता 24 लीटर एवढी ठेवण्यात आली असून, गाडी 21.9 किलोमीटर प्रती लीटरचा अॅव्हरेज देईल, असं कंपनीकडून सांगण्यात येत आहे. 

नव्या नॅनोत सुरक्षितता, आरामदायी सीट्ससह सेंट्रल लॉक, रेडिओ, सीडी, एसी, ब्लू टूथ कनेक्टीव्हीटी आणि पॉवर स्टेअरिंग सारख्या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. शिवाय नव्या नॅनोत ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल ट्रांसमिशनचाही पर्याय उपलब्ध आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.