#ModiInsultsIndia मोदींनी देशाचा अपमान केलाय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा अपमान केलाय, अशा आशयाचा एक ट्विटर ट्रेन्ड सोशल वेबसाईटवर पाहायला मिळतोय. 

Updated: May 20, 2015, 08:01 PM IST
#ModiInsultsIndia मोदींनी देशाचा अपमान केलाय? title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा अपमान केलाय, अशा आशयाचा एक ट्विटर ट्रेन्ड सोशल वेबसाईटवर पाहायला मिळतोय. 

तीन दिवसीय दौऱ्यादरम्यान नरेंद्र मोदी यांनी केलेलं एक विधान काही भारतीयांनी रुचलेलं नाही. ' तुम्हाला भारतात जन्मल्याची लाज वाटत होती?... आता मात्र तुम्हाला भारताचं प्रतिनिधित्व करताना अभिमान वाटतो' असं विधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. ते चीनमध्ये भारतीयांशी संवाद साधत होते.

'गेल्या वर्षभरात सरकारमध्ये जो काही बदल झाला त्यामुळे परदेशात असलेल्या भारतीयांच्या आशा उंचावल्यात' असंही पंतप्रधानांनी म्हटलं होतं. 

यानंतर ट्वविटरवर अनेक भारतीयांनी आपला रोष व्यक्त केलाय... 'पंतप्रधान स्वत:बद्दल बोलत आहेत... आम्हाला भारतीय असल्याची कधीही लाज वाटली नाही' असा सूर ट्विटरवर दिसून येतोय.

पाहुयात, काय काय प्रतिक्रिया पाहायला मिळतायत ट्विटरवर... 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.