...तर या कारणामुळे तुम्ही सिंगल आहात

हल्ली कोणताही मुलगा अथवा मुलगी सिंगल असेल तर त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले जाते. तुला गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड नाही असा प्रश्न आश्चर्याने विचारला जातो. तुम्ही अजून सिंगल आहात का? मग तुमच्या सिंगल राहण्याची ही आहेत कारणे

Updated: Dec 13, 2015, 03:54 PM IST
...तर या कारणामुळे तुम्ही सिंगल आहात title=

नवी दिल्ली : हल्ली कोणताही मुलगा अथवा मुलगी सिंगल असेल तर त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले जाते. तुला गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड नाही असा प्रश्न आश्चर्याने विचारला जातो. तुम्ही अजून सिंगल आहात का? मग तुमच्या सिंगल राहण्याची ही आहेत कारणे

तुम्हाला तुमचे स्वातंत्र्य जपायचे आहे त्यामुळेच तुम्ही सिंगल आहात. एखाद्या रिलेशनशिपमध्ये असल्यावर तुमचे स्वातंत्र्य संपेल याची तुम्हाला भिती वाटते

सिंगल असण्याचे आणखी एक कारण म्हणजे तुम्हाला वाट पाहायला आवडत नाही. 

तुम्हाला स्वत:विषयी अधिक प्रेम असेल हे ही कारण सिंगल असण्याबाबत असू शकते. 

नव्या पिढीला कम्प्युटर गेमचे अधिक वेड असते. कामातून थोडा वेळ फ्री मिळत असेल तर तुम्ही गेम स्टार्ट करता. यामुळेच तुम्ही सिंगल असाल.

जर तुम्ही सिंगल राहण्याची कमिंटमेंट केली असेल तर मिंगल होणे कठीण असते. 

हातात चांगला जॉब नाही, आर्थिक परिस्थितीमुळेही तुम्ही सिंगल असण्याचे आणखी एक कारण आहे.

तुम्ही जर स्वत:ला नेहमी इतरांपेक्षा स्मार्ट समजत असाल तर तेही तुमच्या सिंगल राहण्यामागचे एक कारण आहे. 

तुमची संगत कशी आहे यावरही व्यक्तीची ओळख होते. या कारणामुळेही तुम्ही सिंगल असू शकता.

नकरार्थी विचार करत असाल तर तुमच्या सिंगल राहण्यामागे हे कारण आहे. 

तुम्ही सतत कामात व्यस्त आहात. लव्ह लाईफबाबत तुम्हाला इंटरेस्ट नसेल. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.