व्हॉट्सअॅपवरुन पाठवा १६ जीबीपर्यंतच्या फाईल्स

टेक्स्ट मेसेजची जागा घेतलेल्या व्हॉट्सअॅपवरुन आता तुम्ही हेवी फाईल्सही पाठवू शकता. आतापर्यंत केवळ इमेज, ऑडियो, व्हिडीयो आणि टेक्स्ट मेसेज पाठवता येत होते. मात्र आता १६ जीबीपर्यंतच्या फाईल्स तुम्ही व्हॉट्सअॅपवरुन पाठवू शकता. त्यामुळे तुम्ही एखादा मूव्हीही पाठवू शकणार आहात. यासाठी व्हॉट्सअॅपटूल हे शेअरिंग अॅप बनवण्यात आले आहे. यासाठी तुमच्या फोनमध्ये अँड्रॉईड व्हर्जन ४.१ वरील असणे गरजेचे आहे. 

Updated: Dec 13, 2015, 02:04 PM IST
व्हॉट्सअॅपवरुन पाठवा १६ जीबीपर्यंतच्या फाईल्स title=

नवी दिल्ली : टेक्स्ट मेसेजची जागा घेतलेल्या व्हॉट्सअॅपवरुन आता तुम्ही हेवी फाईल्सही पाठवू शकता. आतापर्यंत केवळ इमेज, ऑडियो, व्हिडीयो आणि टेक्स्ट मेसेज पाठवता येत होते. मात्र आता १६ जीबीपर्यंतच्या फाईल्स तुम्ही व्हॉट्सअॅपवरुन पाठवू शकता. त्यामुळे तुम्ही एखादा मूव्हीही पाठवू शकणार आहात. यासाठी व्हॉट्सअॅपटूल हे शेअरिंग अॅप बनवण्यात आले आहे. यासाठी तुमच्या फोनमध्ये अँड्रॉईड व्हर्जन ४.१ वरील असणे गरजेचे आहे. 

गुगल प्ले स्टोरमधून तुम्ही हे अॅप डाऊनलोड करु शकता. या अॅपद्वारे तुम्ही १६ जीबीपर्यंतच्या फाईल्स शेअर करु शकता. हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर गुगल ड्राइव्हशी कनेक्ट होईल. हे अॅप गुगल ड्राइव्हचा क्लाउडसारखा वापर करते. 

व्हॉट्सअॅपटूल अॅक्टिवेट झाल्यानंतर व्हॉट्सअॅपच्या अॅटॅचमेंट मेन्यूवर जाऊन क्लिक करा. यात फाईल अॅटॅच करुन तुम्ही पाठवू शकता. जी फाईल तुम्ही पाठवाल त्याची लिंक समोरच्या व्यक्तीला जाईल. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर फाईल डाऊनलोड होण्यास सुरुवात होईल. डाऊनलोडिंग संपल्यानंतर फाईल ओपन होईल. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.