पॉवर बँक विकत घेतांना या 7 बाबींवर लक्ष ठेवा

मोबाईल फोनची बॅटरी आता चालता-फिरता चार्ज करण्यासाठी मोठ्या संख्येनं लोकं पॉवर बँक वापरतात. सर्वच कंपन्या आपली पावर बँक चांगली असून लगेच फोन चार्ज होते, असं सांगत असतात. मात्र तरीही पॉवर बँक विकत घेतांना या सात गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

Updated: Jun 18, 2015, 04:18 PM IST
पॉवर बँक विकत घेतांना या 7 बाबींवर लक्ष ठेवा  title=

मुंबई: मोबाईल फोनची बॅटरी आता चालता-फिरता चार्ज करण्यासाठी मोठ्या संख्येनं लोकं पॉवर बँक वापरतात. सर्वच कंपन्या आपली पावर बँक चांगली असून लगेच फोन चार्ज होते, असं सांगत असतात. मात्र तरीही पॉवर बँक विकत घेतांना या सात गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

# जी पॉवर बँक आपण विकत घेत आहात त्याच्या बॅटरीची स्ट्रेंथ कमीत कमी स्मार्टफोनच्या बॅटरी इतकी तरी असावी.

# आपल्या बॅटरीवर लिहिलेली माहिती जरूर वाचा. जर पॉवर बँकची स्ट्रेंथ बॅटरी पेक्षा अधिक असेल तर चांगलं आहे. पॉवर बँकची स्ट्रेंथ जितकी अधिक 'मिली अॅम्प आवर' म्हणजेच एमएएच असेल तितकं चागलं. कारण आपण फोन आणि टॅबलेट दोन्ही त्याद्वारे चार्ज करू शकता.

# हे पण लक्षात ठेवा की, पॉवर बँकचं आउटपूज व्होल्टेज आपल्या फोनच्या बरोबरीचं किंवा त्याहून अधिक असेल.

# जर आपण एक फोन आणि सोबतच एक टॅबलेट ठेवत असाल तर दोन्ही चार्जिंग पोर्टवाले पॉवर बँक विकत घ्या. आपला वेळ आणि आपल्या डिव्हाइसमधील बॅटरीचा जीवही वाचेल.

# जर पॉवर बँकमध्ये ऑटो कट फीचर असेल तर त्यामुळं तो ओव्हरचार्ज होणार नाही आणि जास्त दिवस चालेल.

# आपली पॉवर बँक किती चांगली आहे. याची माहिती घेण्यासाठी एक मायक्रा यूएसबी चार्जिंग किट आपण विकत घेऊ शकता. जी आपल्या मोबाईल आणि पॉवर बँकदरम्यान कनेक्ट होते. यामुळं आपण याबाबीवर लक्ष ठेवू शकता की, आपला फोन लवकर चार्च होईल की नाही.

# जर चार्ज किटचे सर्व लाइन ऑन असेल तर त्याचा अर्थ आपल्या फोनला पूर्ण चार्जिंग मिळतंय. जर केवळ एक किंवा दोन लाइट ऑन झाले तर याचा अर्थ पॉवर बँक कमकुवत आहे. अशात आपल्याला नवी पॉवर बँक विकत घ्यावी लागेल किंवा ती पुन्हा चार्ज करावी लागेल. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.