स्मार्टफोनचा बादशाह ट्युरिंग मोनोलिथ

नुकताच अॅपलने आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस लाँच केले. सोशल मीडियावर या आयफोनची जोरदार चर्चा होतेय. 

Updated: Sep 9, 2016, 03:23 PM IST
स्मार्टफोनचा बादशाह ट्युरिंग मोनोलिथ title=

मुंबई : नुकताच अॅपलने आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस लाँच केले. सोशल मीडियावर या आयफोनची जोरदार चर्चा होतेय. 

या आयफोनला टक्कर देण्यासाठी लवकरच बाजारात नवा स्मार्टफोन येतोय. स्मार्टफोन कंपनी ट्युरिंगने नवा स्मार्टफोन लाँच करण्याची घोषणा केलीये. याचे फीचर्स पाहता हा स्मार्टफोन जगतात भूकंप घडवेल असे वाटते.

ट्युरिंग मोनोलिथ हा स्मार्टफोन 2018 मध्ये लाँच होणार आहे. या फोनचे फीचर्स जबरदस्त आहेत. यात 18 जीबी रॅम आणि 786 जीबी इनबिल्ट मेमरी असणार आहे. 

6.4 इंचाचा स्क्रीन असणार असून यात 3 स्नॅपड्रॅगन प्रोसेसर असेल. यात तब्बल 60 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आलाय. तसेच 20 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असणार आहे. या स्मार्टफोननंतर कदाचित तुम्हाला वेगळा कॅमेरा घेण्याची गरज भासणार नाही.