वर्ल्ड रेकॉर्ड, तो वेगात गाडी गर्रकन पार्क करतो

 अरुंद जागेत गाडी पार्क करणे आणि त्यातही मागे नेत गाडी व्यवस्थित पार्क करणे काय दिव्य असतं, ते प्रत्यक्ष गाडी चालवणाऱ्याच माहीत असते. मात्र गाडी वेगात मागे घेत गर्रकन फिरवून अत्यंत कमी जागेत पार्क करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड, इंग्लंडमध्ये रचला गेलाय.

Reuters | Updated: Nov 13, 2015, 12:28 PM IST
 वर्ल्ड रेकॉर्ड, तो वेगात गाडी गर्रकन पार्क करतो title=

लंडन : अरुंद जागेत गाडी पार्क करणे आणि त्यातही मागे नेत गाडी व्यवस्थित पार्क करणे काय दिव्य असतं, ते प्रत्यक्ष गाडी चालवणाऱ्याच माहीत असते. मात्र गाडी वेगात मागे घेत गर्रकन फिरवून अत्यंत कमी जागेत पार्क करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड, इंग्लंडमध्ये रचला गेलाय.

स्टंट ड्रायव्हर एलेस्टर मोफेट याच्या नावावर हा आगळावेगळा विश्वविक्रम रचला गेलाय. विशेष म्हणजे १२ नोव्हेंबर या दिवशी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड डे साजरा केला जातो. त्याच दिवशी एलेस्टरनं आपल्या ड्रायव्हिंग कौशल्याची निपूणता दाखवणारा वर्ल्ड रेकॉर्ड सरेमधल्या ब्रूकलँड्स म्युझियममध्ये रचलाय. या रिवर्स पार्किंगमध्ये दोन्ही बाजूच्या गाड्यांच्या मध्ये ही कार पार्क केली. १०० मीटर कार चालवून त्यांने १५.७१ सेकंदात हा विक्रम केला.

या रिवर्स पार्किंगमध्ये दोन्ही बाजूच्या गाड्यांचं मिळून अवघं ३४ सेंटीमीटर इतकं कमी अंतर ठेवत, एलेस्टरनं वेगात आपली गाडी बरोबर दोन गाड्यांच्यामध्ये पार्क केली. या आधी अशा प्रकारे वेगात गाडी मागे घेत पार्क करण्याचा विश्वविक्रम ३५ सेंटीमीटर इतक्या अंतराचा होता. तो त्याने मोडीत काढला.

पाहा व्हिडिओ :

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.