वयाच्या ३२ वर्षानंतर लग्न केल्यास काय असतो धोका

अनेक लोकं करिअरच्या बाबतीत एवढे गुगं होऊन जातात की त्यांना आपलं वय वाढंत चाललंय याकडे लक्षच नसतं. अशा लोकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.

Updated: Apr 13, 2016, 07:03 PM IST
वयाच्या ३२ वर्षानंतर लग्न केल्यास काय असतो धोका title=
मुंबई : अनेक लोकं करिअरच्या बाबतीत एवढे गुगं होऊन जातात की त्यांना आपलं वय वाढंत चाललंय याकडे लक्षच नसतं. अशा लोकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे.
 
३२ वर्षानंतर लग्न करणाऱ्या जोडप्यांचं घटस्फोटाचं प्रमाण दरवर्षी ५ टक्क्याने वाढत असतं. २० वर्षानंतर लग्न केल्यानंतर जो संबंध जोडप्यामध्ये तयार होतो तो संबंध वयाच्या ३२ व्या वर्षानंतर होणं कठिन असतं.
 
अमेरिकेतील युनिवर्सिटी ऑफ उटाहच्या एका सर्वेक्षणात ही गोष्ट समोर आली आहे. ३२ वर्षाच्या आधी लग्न केल्यास दरवर्षी ११ टक्क्यांनी घटस्फोट होण्याचं प्रमाण कमी होतं असं देखील या सर्वेक्षणात समोर आलं आहे. २००६ ते २०१० दरम्यान केलेल्या सर्वेक्षणात या गोष्टी समोर आल्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.