व्हॉट्स अॅप वापरण्याच्या विविध राशी

सध्या व्हॉट्स अॅप वर राशीचा मेसेज फिरत आहे. व्हॉट्स अॅपच्या राशीनुसार अॅडमिन कसा आहे. तो काय करतो, याबाबत माहिती देण्यात आलेय.

Updated: Nov 23, 2014, 08:48 AM IST
व्हॉट्स अॅप वापरण्याच्या विविध राशी title=

मुंबई : सध्या व्हॉट्स अॅप वर राशीचा मेसेज फिरत आहे. व्हॉट्स अॅपच्या राशीनुसार अॅडमिन कसा आहे. तो काय करतो, याबाबत माहिती देण्यात आलेय.

मेष - बेधडक प्रत्येक ग्रुप वर डोके आपटणारी रास सगळेच मेसेज यांना आवडतात. परंतु सहसा फॉरवर्ड करत नाहीत.

वृषभ - दर अर्ध्या तासाला अपडेट मेसेज. यातच त्यांचा इतका वेळ जातो की बाकीच्यांचे मेसेज या राशी पहात नाहीत.

मिथुन - या राशींचा मेसेज न पाठविता चँटींग करण्यावर जोर असतो. गप्पा मारतात आणि कुणी नसेलच बोलायला तर उगाच "काय आहेस कुठे मित्रा / मैत्रिणी विसरलास / विसरलीस गेल्या सोळा तासात एकपण मेसेज नाय तुझा" अस म्हणत सगळ्या  काँटँक्ट ना हाकत सुटतात.

कर्क - फार कनवाळू रास आपल्यामुळे कुणाला त्रास नको म्हणून प्रत्येक मेसेज स्विकारतात. प्रत्येक पोस्टला लाईक  करुन कमेँट करतात. दुस-याचे
मेसेज  तिस-याला फाँरवर्ड करतात. पण यांच्या मेसेज ला जर तुम्ही चुकुन कमेँट नाही दीली तर मनाला लावुन घेतात मग कितीतरी महिने मेसेज पाठवित नाहीत.

सिंह - या राशीला फक्त स्तुती आवडते. हे फक्त लाईक केल्याबद्दलही धन्यवाद देतात ." वा छान "या दोन शब्दांनीही हूरळून जातात आणि मी तुमचा  ऋणी राहीन म्हणतात. प्रत्यक्षात तो मेसेज श्रधांजलीचा  का असेना यांना त्यावर कमेँट असली की झाले.

कन्या - वृषभप्रमाणे हे नुसते दर पंधरा मिनिटाला मेसेज फाँरवर्ड करतात. फरक इतकाच की वृषभ वाले सगळं शोधून हे मात्र तयार रि-शेअर  करतात अगदी प्रत्येक.

तुळ - " ठेविले अनंते तैसेची राहावे " या उक्तीवर जगणारी कधी कुणाला कमेँट  नाही,  मेसेज नाही, पहिल्या दिवशी लावलेला प्रोफाईल पिक्चर.  तोच जुना फोटो बदलत नाहीत जुनाट विचारामुळे नवीन व्हर्जन कधीच वापरत नाहीत.

वृश्चिक - प्रत्येक मतावर विरुद्ध मताची मेसेज प्रत्येकाशी  भांडण हा यांचा छंद आणि व्यवसाय पण यांच्या मेसेज कुणी विरुद्ध मत मांडल तर खपवून घेत नाहीत तोंडाला  फेस आल्या शिवाय सोडत नाहीत तुम्हाला.

धनु - फक्त मोठेपणाचा सोस असतो यांना सगळे सेलिब्रेटी फोटोज आणि त्यांचे व्हिडीओज असतात.बाकी मेसेज मध्ये यांना रस नसतो यांना फक्त सेलेब्रिटी लागतो.

मकर - यांना मित्रपरिवार कमी असतो. कारण हे वांटस अँप पेक्ष गुगल सर्चवर पडीक असतात आणि चुकुन आलेच तर चैतन्याचे आदिमुळ बीज
आत्मा स्वरुप आहे असा मेसेज  करुन निधुन जातात.

कुंभ - परोपकारी राशी आपल्या वाँटस अँप वापरण्याने सर्वाना रोजगार मिळाला अशी यांची भावना सतत प्रत्येकाला  मदत करतात. जे आवडलं त्यावद्दल भरभरुन बोलतात आणि आवडल नसेल तर न
बोलता शांत बसतात.

मीन - खाओ पिओ मजा करो हा यांचा स्टेटस मेसेज हे कधीच  नेट डिसकनेक्ट करत ना . 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.