तुम्हाला माहीत आहे @ चा वापर सर्वप्रथम कधी झाला होता?

इंटरनेट, ईमेल आणि सोशल नेटवर्किंगच्या जगात आपण @ या चिन्हाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतोय. मात्र तुम्हाला माहीत आहे का चिन्हाचा वापर सर्वात प्रथम कधी झाला. इंग्रजीमध्ये हे अक्षर कधी आले. ज्या देशांत इंग्रजी बोलत नाही तेथे या चिन्हाला काय बोलले जाते. 

Updated: Mar 16, 2016, 02:11 PM IST
तुम्हाला माहीत आहे @ चा वापर सर्वप्रथम कधी झाला होता? title=

नवी दिल्ली : इंटरनेट, ईमेल आणि सोशल नेटवर्किंगच्या जगात आपण @ या चिन्हाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतोय. मात्र तुम्हाला माहीत आहे का चिन्हाचा वापर सर्वात प्रथम कधी झाला. इंग्रजीमध्ये हे अक्षर कधी आले. ज्या देशांत इंग्रजी बोलत नाही तेथे या चिन्हाला काय बोलले जाते. 

जाणून घ्या @ बाबत इंटरेस्टिंग गोष्टी

जगभरात @ या चिन्हाला वेगवेगळ्या नावाने बोलले जाते. चीनमध्ये फिरवलेला ए असे म्हणतात. तैवानच्या भाषेत लहान उंदीर तर डॅनिश भाषेत हत्तीची सोंड असे म्हटले जाते. 

युरोपातील आणखी एका देशात @ या चिन्हाला कीडा म्हणतात. तर मध्य आशियाई देशात कझाकस्तानमध्ये चंद्राचा कान, जर्मनीमध्ये स्पायडर मंकी, बोस्नियामध्ये झक्की A असे म्हटले जाते. स्लोवाकियामध्ये अचारी फिश रोल, तुर्कीमध्ये सुंदर A असे म्हटले जाते. 

हे चिन्ह पहिल्यांदा कधी वापरले याची गोष्ट खूपच इंटरेस्टिंग आहे. ईमेल आयडीसाठी @ या चिन्हाचा वापर १९७१मध्ये झाला होता. २९ वर्षीय कम्प्युटर इंजीनियर टॉमलिंसन यांनी या चिन्हाचा वापर केला होता. सध्या हे चिन्ह जगभरात ईमेल आयडीमध्ये वापरले जाते. 

त्यावेळी ईमेलचा वापर अधिक केला जात नव्हता. इंटरनेटही नव्हते. ईमेल आयडीमध्ये या चिन्हाचा वापर होण्याआधी इंग्रजीमध्ये भाव सांगण्यासाठी केला जात असे. म्हणजेच दहा सेंट प्रति पोळीच्या दराने वीस पोळ्यांचे भाव सांगणे म्हणजेच २० पोळ्या @ दहा सेंट असे होय. 

खरतंर @ याचा पहिला वापर १५३६ मध्ये करण्यात आल्याचे सांगितले जाते. इटलीच्या फ्लोरेंस शहरातील एका व्यापाराने आपल्या चिठ्ठीत वाईनचा भाव सांगण्यासाठी या चिन्हाचा वापर केला होता. 

या चिन्हाचे मूळ स्पॅनिश आणि पोर्तुगाल भाषेत आहे. दोन्ही भाषेत या चिन्हाचा वापर वजन तोलण्यासाठी होत असे. त्याकाळी वजन तोलण्यासाठी वापर केले जाणारे हे चिन्ह सध्या जगभरात पोहोचलेय.